Ajit Mane - My first pandharichi cycle wari

माझी पहिली पंढरीची वारी, साध्या (single गियर) सायकल वरून
                (7 July - 8 July. 2018)

भक्ती शक्ती, निगडी पुणें - भिगवण- तेंभुर्णी- पंढरपुर- फलटण- जेजुरी-सासवड-थेरगाव, पुणे 
 (476 kms,  सायकल वरील प्रवास 27 तास 7 मि. )

गेल्या वर्षी ICC ( Indo Cyclist Club) मधील 22 जण सायकल वरून पंढरपूरला गेले होते, त्यावेळी माझ्याकडे गिअरची सायकल नव्हती. त्यावेळी मी ठरवलं होतं कि पुढच्या वर्षी नवीन सायकल घेऊन सायकलने पंढरीची वारी जरूर करणार. 
  ICC Devotion Ride announce केल्यानंतर मी Both way साठी register केले. 470 kms चा प्रवास त्यासाठी 8 दिवस अगोदर Scott Road Bike servicing करून घेतली. ऑफिसला रोज mono geared सायकलच वापरतो. रोड बाईक सायकलवर सराव कमी असलेमुळे आणि माझी 200 kms ची BRM mono geared वर एप्रिल मध्ये केल्यामुळे मी ठरवले कि सायकल वारीला मी साधी सायकल घेऊन जायचं.

   मनात फक्त एकच ध्येय ठेवलं, ही सायकल वारी यशस्वी करून, विठु माऊलीचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवून सर्वांना निरोगी ठेव हा आशीर्वाद घेऊन परतीचा प्रवास पण सायकल वरून यशस्वी करायचाच.
 हा प्रवास करताना एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये आली, साधी सायकल असुन देखील सर्व चढाव (Elevation) न थांबता पार केले. फलटण ते लोणंद हा प्रवास सर्वांसाठी टफ झाला कारण 30 ते 32 KMPH चा समोरून येणारा वारा आम्हाला उतारादेखील रस्त्यावर पेंडल मारायला लागत होतं.

आणि हया मनातील तीव्र इच्छाशक्ती मुळे, सायकलने आणि शरीराने दिलेली साथ, माऊलींची कृपा, माझ्या कुटुंबाचा पाठिंबा, ICC चे सर्व मित्र परिवाराचे पाठबळ, आई वडिलांचा आशीर्वाद आणि निसर्गाची पण साथ हया मुळे 476 kms चा हा सायकल प्रवास काहीही त्रास न होता यशस्वी रित्या पूर्ण केला.

  एक आश्चर्य म्हणजे मी जेंव्हा घरी पोहचलो रात्री 12 वाजता, सायकल वरून खाली उतरलो आणि लगेच फटाक्यांचा आवाज सुरु झाला (गावात कुणाचा तरी वाढदिवसाच्या फटाका होत्या त्या) तेंव्हा तो क्षण खुपच समाधानी आणि उत्साही होता.

   माझ्या आयुष्यातील ही अविस्मरणीय पहिली सायकल वारी मी समर्पित करीत आहे माझ्या स्व. वडिलांना , त्यांनी आयुष्यभर (55 ते 60 वर्षे) सायकलने दूधकाम केले, त्यांची प्रेरणा कायम राहणार आहे.