Preeti Maske Blog on ICC Wari 2018

 पुणे पंढरपूर सायकल वारी
      ICC च्या पुणे पंढरपूर वारी च्या ऑनलाईन राजिस्त्राशन ची बातमी ग्रुप वर वाचली आणि मनात आल चला आपणही जाऊया .जायचं ठरवलं याची करणे दोन, एक तर पंढरपूर माझे सासर असल्याने भाग ओळखीचा होता,आणि दुसरं म्हणजे icc . Icc चं फार नाव ऐकलं होतं,त्यांचं वैशिष्टय म्हणजे काटेकोर आणि चोख वेवस्था.मग काय पक्कं ठरवलं इथेच आपण रिस्क घेऊ शकतो, आपलाच भाग आहे , प्रयत्न करायला काही हरकत आहे .अगदी दुसरे बुकिंग माझेच होते . बुकींग केलं खर पण सारख वाटत होतं मला जमेल का? आणि तोच किंतु सर्वांच्या डोळ्यांत दिसत होता , वारी ग्रुप बनवला गेला त्यामध्ये एकही लेडीज च नाव दिसत नव्हतं , पण मिस्टर म्हणाले तू ठरवलं आहेस ना मग सराव कर यश नक्की मिळेलच. दररोज सकाळी रानींग नंतर   8 ते 10 बिबवेवाडी ते दिवेघट पायथा सायकलिंगला  सुरुवात केली , विकएंड ला तुळापूर , घोडेश्वर , भंडारा डोंगर , बोपदेव घाट , लोणावळा  अश्या सोलो  राइड केल्या ,त्यामुळे सायकल ची वेळेला पंकचर काढू शकतो ही खात्री झाली. मग पेडल पूशर ग्रुप बरोबर लॉंग राइड चालू झाल्या , नंतर शनिवार रविवार लागोपाठ 150 - 125 km  राइड केल्या आता थोडा आत्मविश्वास वाढला किंबहूना तो इतरांच्या नजरेत दिसायला लागला त्यातच खूप दिवस वाट पाहिलेली मुंबई राइड अचानक केली, डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली पण 192 km प्रथमच एवढी मोठी राइड दुपार पर्यंत पूर्ण केली दोन दिवस आधी ICC मधून फोन आला की तुम्हाला ग्रुप लीडर बनवलं आहे.गजूला सांगितलं मला नाही जमणार तर तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व बघून घेऊ 5 जुलै ला बिब कलेक्शन झाले,  आमच्या बरोबर मुंबई चे दोन रायडर येणार होते आणि 7 जुलै वरीचा दिवस उजाडला सकाळी 4.15   ला ठरल्या प्रमाणे राकेश , मी आणि मुंबईकर असे चौघे हडपसर कडे निघालो बाकी सर्व मेंबर तिथेच भेटणार होतो                                    रात्रभर पडणारा पाऊस अचानक थांबला , जणू काही त्यानेच आम्हाला green signal दिला होता.जॅम उच्छाही होते आणि हडपसरला पोहोचलो तिथे खूप सारे वारी मेंबर जमा झालेले तर पाहून एकदम जोश संचारला. 
           साधारण 5.40 च्या सुमारास आम्ही हडपसर सोडले आता मात्र सायकल सुसाट सुटली आणि अवघ्या दोन तासात चौफुला गाठले. हा आमचा नश्याचा थांबा होता. आल्या आल्या आमचे स्वागत करून आम्हाला चिक्की दिली गेली वडापाव चिक्की नाष्टा झाला, गणेश ,राकेश श्रीकांत टीम मेंबर बरोबर पुढचा प्रवास चालू झाला आणि 2 km गेलो नसेल तोपर्यंत ज्याची भीती होती तेच झाले.सायकल पंक्चर झाली. सर्वानी पंक्चर काढली आणि जे सुटले ते परत दिसलेच नाहीत.मी ही सायकल वर स्वर झाले आणि परत सुरू झाले ,'धर हँडल मार प्यांडल'  . सायकल वाऱ्याशी स्पर्धा करत होती मस्त वातावरण.मग काय अजून जोश संचारला, स्पीडॉमिटर वर स्पीड 30 - 40-50 km दिसला की खूप भारी वाटत होतं.आणि बघता बघता इंदापूर आलं सुद्धा,आणि वाजले होते सकाळचे 11 फकत.ऋतुजा , अपूर्वा  volunteers  म्हणाले तुम्ही किती फास्ट आलात !ऐकून खूप छान वाटलं, आराम करून 12 pm ला जेवण serve केलं गेलं.इथे icc च्या management चा प्रत्येय आला , जेवण खूपच मस्त होत आणि हॉटेल वल्यानी खूपच आग्रहाने पोटभर खाऊ घातले . इथून पुढे पंढरपूर फक्त 65 Km  होते , 2 तास इंदापुरात घालवल्या नंतर आम्ही 1 pm ला निघालो.आता पंढरपूरची ओढ वाढली होती,सायकल जोरात पळत होती. वाटलं होतं 3.30 पर्यंत पोहोचू पण टेम्भुर्णी च्या पुढे रास्ता खूपच खराब लागला. सायकल कशीबशी चालवत रास्ता पार केला .माझा हात मात्र दुखायला लागला . 
         इथे रस्त्यात एक गंमत झाली, एका ट्रक  वाल्याने आम्हाला सायकली बाजूला घ्यायला लावल्या ,आम्हाला वाटले आता काय झाले, आपण काय चूक केली तर नाही ना,मनात पाल चुकचुकली. तो ट्रक वाला म्हणाला ,'माऊली वारीला चाललात ,ना खर्चायला पैसे घ्या ,'।मला श्रीकांत ला वाटले की  हा काहि मागायला आलाय पण  हा तर चक्क वारीला चालतोय म्हणून खर्चायला मदत करत होता. त्याला सांगितले आम्ही 225 जण चाललो आहे आमच्या ग्रुप ची सर्व व्यवस्था केलेली आहे . त्याने हॅट जोडले व म्हणाला ,'पांडुरंगाला आमचा दंडवत सांगा.'त्या विठ्ठलभक्ताचा निरोप घेऊन आम्ही निघालो.रस्त्याने खूप लोक थांबवून आश्चर्याने चौकशी करत होते.अश्या सगळ्या घटना अनुभवत  आम्ही पंढरपूर ला पोहोचलो,हो हो आम्ही चक्क 4.30 ला पंढरपुरात होतो,फार भारी वाटत होतं.धन्य धन्य झालो.     
      एकच ने आमची राहण्याची व  जेवणाची अप्रतिम सोय केली होती.आता सगळ्यांना ओढ लागली होती ती त्या सावळ्या विठोबाची,विठ्ठल  दर्शनाची.दर्शनाची उत्तम वेवस्था केली होती.ICC टीम सर्वांचे भरभरून कौतुक केले  व सर्वांना मेडल दिले.मेडलवर पांडुरंगाचे चित्र एमबॉस केले होते.
       नणंद , जावा सर्व फॅमिली हार फुले फळे घेऊन कौतुकाने भेटायला आले होते .त्यांचे कौतुक ही खरी पोहोच पावती ,ती मिळाली,फार आनंद झाला .दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास असल्याने सर्वजण दमून झोपी गेले 1 way असलेले लोक गप्पा मारत बसले. आजचा प्रवास खूप छान झाला म्हणून आनंदात झोपी गेलो.

पुणे पंढरपूर वारी  दिवस 2 रा 
                           सकाळी लवकरच जाग आली , काल 225 km चा प्रवास केल्या नंतर आज  परतीचा प्रवास वेळापूर - फलटण मार्गे होता . आवरले लवकर पण सर्वजन  म्हणाले रास्ता नवीन आहे   उशिरा निघू . सकाळी 6.15 am ला कॉफी घेऊन  माऊली ..विठ्ठलाच्या जयघोषात सर्वजण निघालो  गिरीश सरांच्या म्हणण्या प्रमाणे आज सर्वजण एकत्र जाणार होतो . वेळापूर रोडला पाऊस चालू झाला . नाश्ता नातेपुते ला असल्याने सर्वजण बाजूला थांबून वेळापूर च्या जवळ चहाचा आस्वाद घेताना दिसत होते . वेळापूरहून निघालो आणि पावसाची जागा वाऱ्याने घेतली आपोआपच सायकल चा वेग सर्वांचा कमी झाला. अजित माने सर भेटले जे रोड बाईक असताना  सिंगल गियर सायकल वर वारीला आले होते इतका सिम्पल माणूस  त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळाले . मजल दरमजल करत नातेपुते ला पोहोचलो तोपर्यंत 11 वाजले होते . मांमाची सर्व फॅमिली सर्वासाठी स्वीट्स घेऊन भेटायला आली होती . फलटणला कधी पोहोचणार सर्वाची नाश्त्याची व्यवस्था केली आहे म्हणून भावाचा फोन येत होता . खूप छान वाटलं आपल्या लोकांच्या डोळ्यात आपल्यासाठी असणारे कौतुक पाहिले   की एकदम भारी वाटते . तोपर्यंत बरोबरचे खूप लोक पुढे गेले होते . वाऱ्याचा वेग जाणवतच होता . Volunteer  रस्त्यात चिक्की , पाणी ,केली काही हवे आहे का सारखे   विचारत  होते , मोटीवेट करत होते. मला मात्र फलटण कधी येईल असे झाले होते कारण फलटण आले की निम्मे अंतर संपणार होते पण फलटन काही येत नव्हते.आज आमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून आता पुण्यावरून मुले आणि मिस्टराचे फोन यायला लागले होते . हुश्श, एकदाचे फलटण आले पप्पा मम्मी भाऊ सर्वजण वाट बघत होते . त्यांनी आणलेल्या सामोसे , जिलेबी आणि केळीचा आस्वाद घेतला . थोडी विश्रांती घेतली जे दिसतील त्यांना घरचे थांबवून नाश्ता देत होते उरलेला नाश्ता घेऊन हॉटेल महाराजा ला सर्वाना भेटायला आले . इथे आमचा हायड्रेशन पॉईंट होता . लिंबू सरबत बॉटल मध्ये भरून पुढे लोणंद च्या दिशेने निघालो . दुपारचे 3 वाजून गेले तरी 100 मधील फक्त 32 रायडर पोहोचले होते . जेवण लोनंदला हॉटेल शिवार येथे ठरले होते. फलटणपासून हेडविंड हेडविंड ... लोक म्हणतात ते काय चीज असते ते पहिल्यांदाच समजले , कितीही पेंडील मारले तरी वेग काही येत नव्हता , ताशी 8km स्पीड ही मिळत नव्हता . आता मात्र सर्व अवघड वाटायला लागले , बरोबर ग्रुप मधील स्नेहल मदतीला धावून आला  तो म्हणाला तुम्ही माझ्या सायकल मागे सायकल चालवा थोडं वार कमी लागेल . मजल दरमजल करत 5 pm ला लोणंद ला पोहोचलो . फ्रेश होऊन जेवण घेतलं पाठ , अंग दुखायला लागलं होतं . बस आता बास झालं असं बॉडी सांगत होती पण मन मानत नव्हत. जेवण खूपच टेस्टी होत . गिरीश सर येऊन पोहोचले ते म्हणाले  पुढे टेम्पो वगैरे मिळणार नाही मी सायकल बॅकअप मध्ये टाकतोय , मग तर माझी विकेटच  उडाली . स्नेहल म्हणाला काळजी करू नका मी शेवट पर्यंत थांबेन चला हळूहळू जाऊ 8 पर्यंत जाऊ .निघालो राकेश श्रीकांत चा फोन आला ते जेजुरीला पोहोचले होते त्यांना सांगितलं स्नेहल आहे सोबत तुम्ही पुढे निघा , आम्ही हळूहळू निघालो थोडा स्पीड मिळाला बर वाटलं थोडी हिम्मत आली . कोण कोण ग्रेट लेडी ची आठवण काढत पेडल मारू लागलो  आणि तो जेजुरी चा रास्ता आला दोन्ही बाजूला डोंगर सगळीकडे हिरवेगार , एरवी आवडणारा निसर्ग पण आता संध्याकाळची वेळअंधार पडू लागलेला निर्जन रास्ता आता मात्र अंगावर काटा यायला लागला , काही बाही विचार मनात यायला लागले . कधी एकदा जेजुरी येतंय अस झालं होतं , एक ठिकाणी पाणी प्यायला थांबलो गूगल केलं तर जेजुरी 15 km आता मात्र धीर सुटला अंधाराआधीजेजुरी पोहोचनार नव्हतो . बॅकअप ला फोन केला तर ते म्हणाले  ते मागारी वेल्हे ला गेले आहेत काही लोकांना आणण्यासाठी मग काय करणारपटापट  पेडल मारायला लागलो . कधी न बोलणारा स्नेहेल वेगवेगळे किस्से सांगून motivate करत होता .एकदाचे जेजुरी आले आणि माझ्या जिवात जीव आला .तिथून सासवड एकदा दमलो की थोडे अंतर सुध्दा खूप जास्त वाटू1 लागते . पण निघालो दर 5-7 km ला थांबत होतो . असे करत करत एकदाचे सासवड आले . स्नेहेल सायकल चे लाईटस lugaage मधेच विसरला होता , माझे लाईटस deem होत चालली होती. एका पेट्रोल पम्पवर stertching करत असताना आणखी एक मेम्बर आला त्याला म्म्हणाले बरोबरच जाऊ . आता कधी एकदाचा दिवे घाट येतो असे झाले होते , घाट आला की उतार मस्त सुख . तेवढ्याचआशेनं सायकल चालली होती. घाट आला 500 Mtr अलीकडे नेमकी स्नेहलची सायकल puncture झाली . झालं , मी थकलेले नव्हे जवळ जवळ मेलेले त्याने puncture काढे पर्यंतहॉटेल च्या चेअर वर गाढ झोप लागली जाग आली  ती मुलीच्या फोन ने मिस्टर मुलांना घेऊन हडपसर ला वाट पाहून आता फुरसुंगी पर्यंत आले होते , घाटात वरती येऊ का विचार त होते  , मला बॉडी थंड झाल्याने खूप थंडी वाजायला लागली , संध्याकाळी 7 ला पोहोचणार आम्ही 11 वाजले तरी अजून पुण्यात पोहोचलो नव्हतो . घरच्यांना तिथेच थांबायला सांगितले. StraVa चेक3 केल अजून 2 री डबल century पूर्ण व्हायची होती . दोघांचेही lights पूर्ण गेले होते  तिसरा ग्रुप मेंबर म्हणाला मी सायकल पुढें चालवतो तुम्ही follow करा . निघालो घाट उतरून आलो पुढे आलो तर आमची कार दिसली , त्या दोघांना बाय केलं , finally 11.30 pmवाजता anniverssary विश केली.एवढा वेळ ठेवलेल्या patience चे सार्थक झाले होते  वारी  माझ्यासाठी पूर्ण झाली होती . घरच्यांनी हार फुलाने, शुभेच्छा देऊन  स्वागत केले.गजूला सुखरूप पोहोचल्याचे कळवल. सर्व icc मेंबर्स, participents नि खूप प्रोत्साहन , कौतुक , सपोर्ट , patience दाखवला त्याबद्दल सर्वांचे खूप आभार.

Preeti Maske