Jitendra view on cycle wari 2018

पाऊले चालती पंढरीची वाट !!!!
  शब्दशः खरा अनुभव घेणारी सायकल वारी INDO CYCLIST CLUB या ग्रुप मुळे घडली. या रोमांचकारी वारीचे हे तिसरे वर्ष आहे असे कळले, पहिल्या वर्षी 5-7 स्वार, दुसऱ्या वर्षी 12-15 स्वार, आणि तिसऱ्या वर्षी  250 स्वार , यात आम्हीही सहभागी झालो.
     आध्यात्म , पर्यावरण आणि शारीरिक कसोटी यांची सांगड घालून ह्या पंढरी वारीचे नियोजन केले गेले. ICC ग्रुपच्या वरीष्ठ मंडळींनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करुन ही वारी परिपूर्ण केली. 
      250 सायकल वारकरी एका बाजूने आणि 100 वारकरी दोन्ही बाजूने वारी पूर्ण करणार होते. हडपसर येथुन सकाळी 5:30 वाजता Flag off केल्यानंतर सगळे वारकरी सुसाट सुटले. ऊरूळी कांचन येथे पहीला hydration point होता. चौफुला येथे नाष्ट्याचे नियोजन होते. येथे club तर्फे चिक्क्या वाटप झाले. पुढचा hydration point भादलवाडी, तर जेवणाची व्यवस्था  इंदापूर बायपास येथे माऊली प्रसाद  करण्यात आली होती.
       वारीत सहभागी झाल्यानंतर अनुभवसिद्ध  cyclists शी संपर्क आला. 71,68,65 वर्षाचे cyclist सहभागी झाले होते.साहजिकच त्यांच्याशी चर्चा करतांना knowledge मध्ये भर पडली. वेगवेगळ्या कंपनीच्या cycles बघायला मिळाल्या.stamina कसा वाढवावा, long journey साठी काय तयारी करावी, cycle चे सेटींग कसे असावे, equipment कसे वापरावे ह्या सगळ्या गोष्टी शिकलो.
    इंदापूर बायपासला वेळेच्या अगोदर पोहोचलो. सोपान आणि मी पहील्या 10-15 तच होतो.होटेल माऊली प्रसाद येथे अतिशय सुंदर जेवण आग्रहाने खाऊ घातले. होटेल मालकाचे आभार मानून पुढे निघालो. वारकरी म्हणून प्रत्येक ठिकाणी special  treatment मिळत होती.सोलापूर हायवे चारपदरी असल्यामुळे सायकल चालवायला अजिबात ञास होत नव्हता .त्यात climate अतिशय सुंदर होते.पंढरपूर फाटा कधी आला कळलेच नाही.तेथे करकंभ येथे hydration point होता.त्यानंतर माञ रस्त्याचे काम चालू असल्याकारणाने खूपच खराब होता.cycle पंक्चर होण्याचा संभव जास्त होता.बर्याच जणांच्या झाल्याही पण आम्ही सुटलो. संध्याकाळी 4:30 वाजता सुखरुप पंढरपूरी पोहोचलो. खुप आधीपासून डोक्यात विचार होता, वारीत जायचा पण तो अश्याप्रकारे पुर्ण झाला खुप आनंद झाला.या बाबतीत आपले काहीच चालत नाही, देवच हे कार्य करवून घेतो.
      गजानन महाराज भक्त निवास येथे राहण्याची सोय केली होती.येथील स्वच्छता हेच सर्वात मोठे आकर्षण होते.200 बेडचा मोठ्ठा हॉल आम्हाला देण्यात आला होता. संध्याकाळी फ्रेश झाल्यानंतर सुग्रास असे जेवण केले. 9 वाजता मंदिरात गाभाऱ्यात जावून दर्शन घेतले.सायकल वारकरी आलेत हा तेथील उत्सुकतेचा विषय ठरला होता.सगळेच सारखी चौकशी करत होते.
     दुसऱ्या दिवशी वेळ मिळणार नव्हता म्हणून राञीच Medal distribution करुन घेतले.सर्वात वरीष्ठ व लहान वारकर्यांचे कौतुक करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निघायचे असल्यामुळे 11 -11:30 ला सगळे ढाराढूर झोपले. जे एकाच बाजूने प्रवास करणारे होते ते निवांत होते. आम्ही पहाटे 5 वाजताच आवरुन  तयार होतो. काळ मस्तीत आणि जोशात राईड झाली होती पण आज सगळा कस लागणार होता. कोण किती तयारीचा आहे हे स्वतःला कळणार होते.विठ्ठलानामाचा जयघोष करत बरोबर 6 वाजता निघालो.
        वेळापूरला पहिला hydration point, नातेपूतेला breakfast , फलटनला दुसरा hydration point, लोणंदला जेवण असे नियोजन होते. पंढरपूरातून निघतांनाच पावसाची रिपरिप सुरु झाली आणि जोरात वारा वाहू लागला, head wind म्हणतो त्याला आपण, सगळ्यांचा speed अगदी निम्म्यावर आला. काल प्रत्येक point वर before time पोहोचणारे आम्ही आज प्रत्येक ठिकाणी 1 तास उशिरा पोहोचत होतो.नाष्टा point वरुन फोन आलेत अजून कोणीच कसे आले नाहीत, त्यांना कळवले head wind चालूच देत नाही, pedal थांबले की सायकल थांबते.काही लोकांना ञास सुरु झाला, सायकल  puncture झाल्या त्यांनी मागून येणाऱ्या truck मध्ये टाकल्या. शारीरीक क्षमता आणि मानसिक तयारी जोखण्याची ही वेळ होती, सोपान आणि मी ठरवलेच होते कुठल्याही परिस्थितीत वारी पुर्ण करायचीच.प्रत्येक तासाच्या अंतराने ईलेक्ट्रोलचे पाणी पिऊन hydration maitain केले. सकाळपासून 10 तास जेजुरीपर्यंत आम्ही head wind शी झुंजत होतो त्यानंतर माञ सुटका झाली आणि आम्ही Top gear टाकला, रस्ताही चांगला होता. दिवेघाटाचे सर्वाधिक आकर्षण होते, हरीनामाचा जप करत घाट ओलांडला, हडपसरला पोहोचल्यावर घरी फोन केला तासाभरात येतच आहे, पोहोचल्यावर सोसायटीच्या लोकांनी सहर्ष स्वागत केले, गृहलक्ष्मीने औक्षण केले.आणि पंढरपूर वारीची सुखरुप सांगता झाली.
            ह्या वारीची तयारी करण्यासाठी ICC चे सिनियर मेंबर एक महीन्यापासून तयारी करत होते.मी नविनच असल्यामूळे मला जास्त नांव माहीती नाहीत पण गज्जु, अजित, गिरी, शंकरदादा, असे अजूनही दिग्गज यात सहभागी होते, संपूर्ण route ची रेकी करुन नियोजन केले होते, प्रत्येक cyclist ची काळजी घेण्यात आली होती, 3 - 4 backup mobile van होत्या, mechanics होते, luggage आणि सिंगल वारी करणाऱ्या लोकांच्या सायकलींसाठी 3 truck होते. अगदी परिपूर्ण व उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते.पुढच्या वर्षी निश्चितच अजून मोठी वारी होईल, अर्थात आमचा सहभाग असणारच आहे.
          !!!!!!!! जय हरी विठ्ठल !!!!!!