Thought Story on Wari 2018

*Devotional Cycle wari to Pandharpur* 

पंढरपुर ला कधी सायकल वर जाईल अस स्वप्नात पण वाटल नव्हतं. पंढरपुरची वारी पूर्ण केल्या नंतर चे क्षण सांगायला शब्द नाहीत.  खुपच मस्त आणि ऊत्साहवर्धक असा हा अनुभव आहे. येणारी अनेक वर्ष याची ऊर्जा वृद्धिगत होत जाईल व टिकून राहिल यात कुठेही शंका नाही ... 

दिनांक: 7-7-2018, सकाळी 4:00 वाजता सर्व सायकल धारि वारकरी पंढरपुरच्या वाटेवर निगडि भक्ति शक्ति येथून मार्गस्त जाले. 20 km च्य प्रवास पूर्ण जाला व रेसकोर्सला पोहचलो माला टायर पंचर असावा असे जानवले. उतरून बघतो तर खरच टायर पंचर होता. मागील चार राइड मधल हे 4 पंचर होत. थोडक्यात सांगायचं तर टायर मध्ये कुठे तरी प्रॉब्लम होता पण सापडत नव्हता. टायर बदलने हाच योग्य पर्याय उरला होता. बैकअप ट्यूब होती पण टायर घेऊन आलो नव्हतो. काही क्षणांन साठी मनात विचार आला की आता मधुनच परतीचा प्रवास चालू करावा लागेल की काय? रेसकोर्सला पुरेपुर अंधार होता सायकल पंचर होती. बाकी सहकारी मदत करू पाहत होते पण अंधार असल्या कारणाने काही लिमिटेशन येत होते. इतक्यात काही मदत हावी आहे का? अशे शब्द कानावर आले. बाजूला स्विफ्ट डिझायर ऊभी होती व ICC ची टीम मदती साठी हजर होती. गाडिला साइकल स्टैंड लावले, साईकल लोड केली व क्रोमा हडपसर पर्यन्त आलो. तिथे रिपेयरिंग मेकैनिक शी संपर्क साधला. आदित्य पांढरे त्या टीम ला लिड करत होते. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी त्यांचे कड़े टायर आहे का ते चेक केले. टायर सोबत आहे है त्यांनी सांगितले आणि जीव भांडयात पडला. मनानी पंढरपुर च्या दिशेनी प्रवास चालू केले. टीम ने विलंब न करता सायकल सपोर्ट ट्रक मध्ये लोड केली. बघता बघता 10-15 मिनिट मध्ये सायकलच्ये टायर ट्यूब चेंज केले व सायकल पुढील प्रवासासाठी तयार होती. पंढरपुरचा प्रवास चालू केला. पुढचा प्रवास सुखद पार पडला.... 

ICC Group व टीम चे विशेष आभार. अजित सर, गजु सर, गणेश सर व समस्त ICC Core Team आपले आभार. 

ICC Group अशा पद्धतीने विविध events करत राहो. सायकल चालवणाऱ्याची संख्या वाढत राहों. आमचाहि त्यात हात भार लागत राहो हीच पांडुरंग चारणी इच्छा व्यक्त करतो.

Really thanks for all organizers of ICC & complete support crew ... You all have taken the best possible care of all of every participent ... Hats off to the complete Team ... 

Looking forward for more events in future......

 *!!! पांडुरंग हरी !!! जय हरी विठ्ठल !!!*

 

By Rajesh Haramkar