Santosh Zende - Story on Pandharpur Wari 2018

<p>ICC ची सायकल वारी !! निघाली पंढरी च्या द्वारी !!इंडो सायकलिस्ट क्लब च्या वतीने 7 आणि 8 जुलै 2018 रोजी पुणे -पंढरपूर- पुणे डिव्होशनल सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते !! 1 मे ला registration चालू झाल्या नंतर पहिल्याच लॉट मध्ये बोथ वे राईड साठी नाव नोंदणी केली आणि मग आस लागली ती सात जुलै ची !!! कधी एकदा तो दिवस येतोय असे झाले होते !!! तत्पूर्वी वारीची तयारी म्हणून जून मध्ये लोणावळा आणि सातारा अशा दोन दोनशे कि मी च्या राईड पूर्ण केल्या उगीच फजिती नको म्हणून !!तशी रोजच थोडी थोडी प्रॅक्टिस चालू होतीच .. तरीपण मी आपलं long राईड ची प्रॅक्टिस करून घेतली !!! असो!!!! अखेरीस तो दिवस (7 जुलै) उजाडला !!! आदल्या दिवशी रात्री सौ ने सर्व तयारी करून ठेवली बॅग वगैरे भरण्याचे सोपस्कार करून झाल्यावर पुनः एकदा सर्व गोष्टी जसे की puncture kit ; hrm front &amp; back lights gps आणि महत्वाचे म्हणजे मोबाईल !!(त्याशिवाय तर थोडीच ride पूर्ण होणार होती !) पाहून घेतल्या.. शनिवारी सकाळी पहाटे चार वाजता उठून सर्व सोपस्कार आवरून साडे चार वाजता घरून निघालो !! अर्थात सौ चा निरोप आणि शुभेच्छा घेऊनच !!सकाळच्या थंड आणि रम्य वातावरनात दिवे घाटाच्या धुक्यातून मार्ग काढत 5:30 वाजता हडपसर गाठले !! आम्ही हडपसर पासून सुरुवात करणार होतो म्हणून . हडपसर ला येऊन पाहतो तर काय जवळ जवळ 150 सायकल स्वार दाखल झाले होते !! आमच्या ग्रुप चे ग्रुप लीडर डॉक्टर धनराज हेळंबे यांची भेट घेतली त्याच प्रमाणे icc चे इतर सदस्य यांची देखील भेट घेतली . बरोबर 5 वाजून पन्नास मिनिटांनीअजित पाटील आणि गजू सरांनी फ्लॅग ऑफ केला आणि आमचा पहिला ग्रुप (A ग्रुप ) बोला पुंडलिक कवर देव हरी विठ्ठल !! श्री ज्ञानदेव तुकाराम !! पंढरीनाथ भगवान की जय !!असा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला !!! पहिला टप्पा : हडपसर ते चौफुला (50km) सकाळच्या रम्य वातावरणात इतर सायकल स्वारांच्या साथीने लोणीच्या दिशेने निघालो वाटेत अनेक सायकल मित्र भेटत होते सर्वाना हाय करत आणि ओळख करून घेत घेत पुढे जात होतो .. वाटेत अनेक ठिकाणी छोटा बालचमू हात करून thumbs up करत होते त्या सर्वांना हाय करून मी आणि विजय पुढे जात राहिलो पुढे गेल्यावर संतोष मोहिते आणि नितीन निकम यांची भेट झाली .. पहिला स्टॉप हा चौफुला येथे होता .. मी विजय आणि डॉक्टर अक्षय चौधरी असे तिघे जण एकत्रच जात होतो मधेच विजय सरांनी स्पीड वाढवण्याचा आदेश दिला आणि मग काय !! सकाळचे रम्य वातावरण त्यात शनिवार म्हणजे पवनपुत्र हनुमान यांचा दिवस !! पवन देव यांची कृपा ! निघालो सुसाट आणि पावणे आठ वाजता चौफुला गाठला !! तेथे आयोजकांच्या वतीने नाश्ता आणि चहाची उत्तम सोय करण्यात आली होती !!! मग काय ! जम्बो वडापाव आणि गरमा गरम चहा व्वा !! आणि तेही अनलिमिटेड !!मग काय विजय भाऊ आणि अक्षय बरोबर भरपेट नाश्ता केला . तेथे रवींद्र कणसे गिरीभाऊ उमरीकर सौरभ कान्हेड गजु सर सतीश कुरपड कपिल लोखंडे शंकर दादा आणि इतर अनेक जणांची भेट घेतली आणि पुढे निघालो !!! टप्पा दुसरा : चौफुला ते इंदापूर ( 80 km ) विजय भाऊ काही आपणास सापडणार नाहीत म्हणून मग मी आणि डॉक्टर अक्षय चौधरी दोघेच 8:45 वाजता इंदापूर च्या दिशेने निघालो !! वाटेल जेथे फोटो काढण्याचा मोह होईल तेथे थांबून फोटो काढून घेतले आणि पुढे जात राहिलो !! वाटेत संतोष आणि नितीन निकम तसेच दत्तात्रय पवार वाघमारे सर आणि इतर अनेक मित्र भेटत होते !! आत्तापर्यंत ज्या ज्या सर्वाना फक्त फेसबुक आणि स्ट्रावा वरच भेटत होतो !!अशा सर्वाना भेटण्याचा योग ICC मुळे आला !! त्या बद्दल ICC चे खूप खूप धन्यवाद !!बरे असो !!! पवन देव प्रसन्न असल्या मुळे सायकल चालवायला आजिबात त्रास होत नव्हता !! आरामात आणि सुसाट सायकल चालवत अवघ्या पावणे तीन तासात दुसरा टप्पा पूर्ण केला !!! मंध्यंतरी icc support team च्या वतीने चिक्की आणि पाणी वाटप चालू होते !! त्याचा स्वीकार करून पावणे बारा वाजता इंदापूर गाठले !!! या ठिकाणी ICC च्या वतीने जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती!!तेथे गेल्यावर पाहतो तर काय !! सौरभ कपिल धनराज सर विजय भाऊ कपिल भाऊ !! आमच्या अगोदर हजर !!.. तेथे जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतला .. जेवताना विजय सरांनी कार्ब्ज चा भरणा कर असा आदेश दिला !! मग काय !! दोन तीन भाताच्या प्लेट्स वर आडवा हात मारला !! आणि मग मी पण थोडा वेळ आडवा झालो !! काही वेळानंतर रवी गणेश सतीश आणि इतर जण आले !!! जेवून बाहेर आल्यावर पाहिले तर काय !!! कॅमेरवूमनऋतुजा शिंदे यांचे फोटो सेशन चालू होते !! विजय सर वेगवेगळ्या अँगल आणि पोज मध्ये फोटो काढून घेत होते . मग मी पण माझी फोटोची हौस भागवून घेतली !! कपिल भाऊ बरोबर देखील एक फोटो घेतला !! सौरभ बरोबर देखील एक फोटो घ्यायची इच्छा होती पण सौरभ दादा काही केल्या हाताला लागलाच नाही !!!</p>

<p>टप्पा तिसरा : इंदापूर ते पंढरपूर via टेम्भुर्णी !!(70km) मनी एकच ध्यास !!फक्त विठ्ठलाची आस !या उक्ती प्रमाणे आता मनाला विठ्ठलाची आणि त्याच्या दर्शनाची ओढ लागली होती.. या टप्प्यामध्ये मी माझा प्रिय मित्र रवींद्र कणसे यांच्या बरोबर राईड करण्याचे ठरवले .. सोबत गणेश कानप आणि सतीश कुरपड हे देखील होते .. दुपारी जेवल्या नंतर 1.30 वाजता आम्ही चौघांनी टेम्भुर्णी मार्गे पंढरपूर कडे प्रस्थाण ठेवले तेही विठू नामाचा गजर करत करत !!.. रवी आणि मी आरामात सायकल चालवत होतो .टेम्भुर्णी नाक्यावर एक पोलीस मामांची भेट झाली त्यांनी खूप आपुलकी ने आमची विचारपूस केली .. आम्ही पुण्याहून पंढरपूर ला सायकलवर चाललो आहे यांचे त्यांना खूप अप्रूप वाटले ..त्यांनी आमच्या बरोबर एक सेल्फी काढण्याची ईच्छा व्यक्त केली आम्ही पण त्यांची इच्छा सर आँखो पर म्हणून चांगले चार पाच फोटो काढले आणि पुढे निघालो .. सतीश आणि गणेश देखील जोरात होते .. शेवटचे साधारण दहा किलोमीटर चा रस्ता खूप खराब असल्यामुळे थोडा वेग मंदावला होता त्यातच मग आम्ही थोडे मागे पुढे पडलो . मी आणि सतीश पुढे आणि रवी आणि गणेश मागे असे जात राहिलो टप्प्यात गुरु; प्रल्हाद जाणी कपिल आणि सुनील पटेल आणि त्यांचे इतर जोडीदार यांची भेट झाली !! त्यांच्या बरोबर चहा घेतला आणि बरोबर पाच वाजता विठुरायाच्या पंढरीत नतमस्तक होण्यासाठी दाखल झालो !!! जय हरी विठ्ठल !!</p>

<p>*** संपूर्ण वारीच्या प्रवासात ICC च्या कोअर कमिटीने अतिशय सुंदर चोख आणि अप्रतिम असे नियोजन केले होते .. कुठेही कशाचीही कमी नव्हती .. अजित पाटील शंकर दादा गाजू सर कपिल भाऊ सौरभ दादा गणेशभुजबळ दादा गिरीभाऊ अविनाश अनुशे त्याच शंकर उणेचा माधुरी मॅडम त्याच प्रमाणे ICC सपोर्ट टीम चे इतर सदस्य सर्वानीच अतिशय सुंदर नियोजन केले होते .. त्या साठी सर्वाना मानाचा त्रिवार मुजरा ! पंढरपूर मध्ये दाखल झाल्यावर निवासाची व्यवथा देखील खूपच छान होती !!गजानन महाराज मठात एका प्रशस्त हॉल मध्ये सर्वांची (225 जणांची ) राहण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती .. आमच्या बॅग्ज मागे ट्रक मध्ये असल्यामुळे थोडा वेळ वाट पाहावी लागली . मग आम्ही 7 वाजता ट्रक आल्या वर बॅग्स ताब्यात घेतल्या आणि हॉल मध्ये फ्रेश होऊन पुन्हा दर्शनासाठी बाहेर जमलो ... रात्रीचे जेवण झाल्यावर दर्शनासाठी देखील गिरीभाऊ यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते गिरीभाऊंच्या ओळखीनेआणि पंढरपूर देवस्थान च्या ट्रस्टी यांच्या मदतीने सर्वाना विठू रायाच्या थेट दर्शनाचा लाभ घेता आला !! थोडक्यात काय तर ICC मुळे विठुरायाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभले असे म्हटले तरी वावगे ठरू नये असे मला तरी वाटते !! विठू माऊलींचे दर्शन घेतल्या मुळे प्रवासाचा शिण कुठल्या कुठे पळून गेला समजले देखील नाही थकवा मुळी आलाच नव्हता म्हणा !! कारण ICC ने प्रॅक्टिसच तशी करून घेतली होती...... विठ्ठलाचे आणि रुक्मिणी देवीचे दर्शन घेऊन आणि एका अविसमरणीय राईड च्या आठवणी मनात घोळवत कधी डोळा लागला ते कळलेच नाही !!!.... 8 जुलै 2018 परतीच प्रवास : पंढरपुर ते पुणे via फलटण लोनंद .... दुसऱ्या दिवशी सकल लवकर निघन्याची तयारी चालू होती सकाळी शंकर उनेचा यांची भेट झाली शंकर भाऊ म्हणजे ICC मधील एक अफलातून व्यक्तिमत्व !! त्यांना भेटन्याची माझी खुप दिवसा पासून ची इच्छा होती ती या वारीच्या निमित्ताने पूर्ण झाली ... शंकर भाऊ नी ICC वर एक सुंदर भजन रचले होते त्यावर सर्वानी ठेका धरला !!! त्यानंतर गजु आणि अजित पाटिल यानी परतीच्या प्रवासबद्दल सर्व माहिती आणि सुचना देवून सर्वाना सुरक्षित राइड करण्याच्या सुचना दिल्या आणि आम्ही ठीक सात वाजता वेळापुर कड़े प्रस्थान ठेवले !! सकाळच्या रम्य वातावरणात आणि हलक्या पावसाच्या सरित आम्ही निघालो . मी रवि आणि गणेश असे त्रिदेव एकत्र प्रवास करात निघलो !!! सकाळी 9:30 वाजता वेळापुर येथे नाश्ता करुण पुढे मार्गस्थ झालो ..काल प्रसन्न असणारे पवन देव आज मात्र रागवलेले दिसत होते !! जाणुकाही त्यानी आज जमदग्नी ऋषीं चा अवतार घेतला होता वेळापुर ते माळशिरस नाते पुते आणि फलटण हा 105 km चा टप्पा पार करायला तब्बल 7 तास लागले प्रचंड प्रमाणात वाहत असलेले वारे आणि त्यामुळे सायकल चालवायला जड़ जात होते मि आणि गणेश दोघेही प्रत्येक टप्पा टारगेट ठेवून पूर्ण करत होतो.. नातेपुते येथे आम्ही थोडासा विसावा घेतला त्याठिकानी अजित माने यांची भेट झाली ते आपल्या मोनो गियर सायकल वर आले होते ..फलटण ते लोनंद हा 28 km चा टप्पा पूर्ण करायला हेड विंड मुळे बराच वेळ लागला कितीही paddle मारले तरी सायकल पळतच नव्हती 13 --14 च्या पुढे स्पीड काही केल्या जात नव्हते !! तरी सुद्धा फ़क्त धर हैंडल आणि मार प्याण्डल हे एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवून मार्गक्रमण करत होतो ...फलटण च्या पुढे आल्यावर हॉटेल महाराजा येथे प्रीती म्हस्के मैडम यांनी त्यांच्या एनिवर्सरी निमित्त जिलेबी आणि सामोसे दिले त्याचा स्वीकार करुण आणि सरबताची बाटली भरून घेवून लोनंद च्या दिशेने निघालो वाटेत गिरीश कुलकर्णी सर सचिन घोगरे आणि सौरभ यांची भेट झाली.. सचिनशी गप्पा मारत मारत साड़े चार वाजता लोनंद गाठले !! संपूर्ण मार्गात Icc सपोर्ट टीम चे सदस्य चीयर अप करत होते ...त्यामुळे सायकल चालवायला प्रोत्साहन मिळत होते लोनंद ला शिवार गार्डन येथे जेवनाची उत्तम सोय करण्यात आली होती..थोडेसे जेवण करुण लोनंदहुन 5 वाजता आम्ही पाच सहा जन सासवड च्या दिशेने निघालो .... लोनंद ला आल्यावर मात्र मला होम पिच ला आल्यासारखे वाटले !!आणि अंगात नविन जोश संचारला !!. होम पिच अशासाठी की मि या रोड वर लोनंद पर्यन्त बऱ्याच राइड केलेल्या आहेत .. मी सासवड चा असल्या मुळे !!! ज्या प्रमाणे होम पिच वर फलंदाज जोरदार फलंदाजी करतो त्याच प्रमाणे 15 मिनिटातच नीरा गाठले !!! पुढे आल्यावर गणेश ची सायकल पंक्चर झाल्यामुळे थांबलो .. पंक्चर काढुन पुन्हा निघालो वाटेत पुढे विजय भाऊ आणि अजित माने भेटले .. जेजुरीला सर्वानी चहा घेतला .. आणि आठ वाजता सासवड ला पोचलो ...सर्वांचा निरोप घेतला आणि 8:30 ला घरी सुखरूप पोहोचलो !!!! संपूर्ण परतीच्या प्रवासात ICC सपोर्ट टीम ने अतिशय सुंदर नियोजन केले होते ते सर्वांची काळजी घेत होते ... काय हवे नको याची जबबदरिने चौकशी करत होते आणि प्रत्येक ठिकाणी चीयर अप करत होते त्याबद्दल संपूर्ण सपोर्ट टीम चे खुप खुप धन्यवाद !!.... विशेष आभार : ICC CORE COMITEE ने या सायकल वारीचे अतिशय सुंदर असे नियोजन केले होते !!! त्यासाठी ICC चे त्रिवार आभार आणि मानाचा मुजरा !!! अजित पाटिल शंकर गाढ़वे गजु सर कपिल लोखंडे सौरभ कान्हेड गिरिभाऊ गुनवंत कुटे शंकर उनेचा अविनाश अनुषे कपिल पाटिल आणि इतर सर्व यांचे सर्वांचे मनःपूर्वक आभार !!विशेष मार्गदर्शन : माझ्या आजच्या राइड मधे माझी सायकल एकदाही पंक्चर झाली नाही .. याचे श्रेय त्या विठु रायाला !! ज्याने माझी काळजी घेतली ... त्याच प्रमाणे माझे सायकलिंग मधील मार्गदर्शक आणि गुरु श्री विजय वसवे सर !!हे नेहमी मला ready to use सल्ला देत असतात .. त्यांच्या टिप्स खुप कामी येतात I JUST FOLLOW HIM &amp; NOTHING ELSE !! मला काहीच शोधावे लागत नाही सर्व काही विजय सरांच्या सल्ल्या मुळे खुप सोपे आणि सहज उपलब्ध होते !! म्हणून त्यांचेही खुप खुप आभार !! वैयक्तिक माइलस्टोन :: माझ्या आता पर्यन्त च्या सायकल प्रवासा ला 10 महीने पुर्ण झाले .. आजच्या वारीच्या राइड पर्यंत आपना सर्वांच्या प्रोत्साहना मुळे 7000km चा टप्पा पूर्ण झाला आहे ...</p>

<p>&nbsp;</p>

<p>Santosh Zende</p>