Vijay Vasave Blog - Why Tour De Wari

“आयसीसी पंढरपुर सायकलवारी” 
नाही रे भावा... मी कुठला जातोय युरोपात सायकल चालवायला. प्रश्न फक्त सायकल चालवण्याचा असता तर गोष्ट वेगळी होती पण युरोपातील सायकलिंग खिशाला खड्डा पाडणारे असते. खड्डा म्हणजे असा तसा नव्हे तिथे सायकल चालवण्याचा खर्च १२५ ते १५० रूपये प्रति किलोमीटर असतो. 
शॉक लगा क्या? शॉक लागण्यासारखेच आहे हे जे लोक युरोपात जाऊन पीबीपी आणि एलईएल स्पर्धेत सहभागी होऊन आले आहेत त्यांना विचारू शकता... नाही म्हणजे काही लोकांना खरे वाटत नाही हो. 

आमच्या आयसीसी पंढरपुर सायकलवारीसाठी किती खर्च आला माहीती आहे का? काही अंदाज वगैरे... फक्त २ रूपये प्रति किलोमीटर... हाहाहा.. किती भारी ना! हो भारीच आहे हे. ४४० किमी सायकल चालवण्यासाठी साधारण ९०० रूपये खर्च आला. ७०० रूपये प्रवेश फि, २०० रूपये (नाष्टा आणि जेवणाचे) 

आणि यामध्ये काय काय मिळाले माहीतीये? एक टि-शर्ट, पांडुरंगाचा छाप असलेले फिनिशर मेडल, रात्रीचा मुक्काम, पांडुरंगाचे थेट दर्शन, अमर्यादित नाष्टा, अमर्यादित जेवण आणि संपुर्ण रस्त्यात अमर्यादित मदत. हायड्रेशन पॉइंटवर पाणी, चिक्की, गुडदाणी, केळी इ. तर असायचेच याचबरोबर एक ट्रक, दोन कार सतत सोबतीला असायच्या. अजुन काय हवंय?  कीरकीर करणारे कोणी नाही आणि कोणाची हुकुमशाही नाही.

पण कसंय ना आपली लोकं युरोपातच जाणार सायकल चालवायला. बघा तुम्ही 
जेव्हा बाहेरच्या देशातील सायकलपटु या सायकलवारीत सहभागी व्हायला येतील तेव्हाच खरी मजा येईल.
आता ही सायकलवारी चुकू नये हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!

जय हरी विठ्ठल 
- विजय वसवे