सायकल स्वार महाराजांच्या मुलखात - Pune to Raigad Cycle Ride

सायकल स्वार महाराजांच्या मुलखात - शिवराज्य अभिषेक सोहळा (गिरी च्या ब्लॉग मधून )

सहाय्य रायडर्स आणि त्यांच्या सोबत इंडो सायकलिस्ट क्लब व सायकल मित्र ग्रुप्स मधील २२ सायकल स्वार दिनांक २ जून शनिवारी रोजी पुणे ते रायगड सायकल राईड साठी तयार झाले . मुख्य म्हणजे सर्वांनाच जवळ जवळ १२५ ते १३५ km चे अंतर पार करायचे होते . स्वामी समर्थ मंदिर शिवतेज नगर मधून सर्व सायकलिस्ट चे औक्षण करून झाले आणि काही मुख्य अतिथी कडून भगवा झेंडा फडकावून प्रवासाची सुरुवात  झाली . आमच्या सोबत बॅकअप ट्रक , पाणी , झोपण्या साठी लागणारी बेडडींग इत्यादी सर्व काही टेम्पो मध्ये लोड झाले . सुमारे सायंकाळी ६ वाजता सर्व बुवा मंदिर जवळ ब्रेक घेतला . त्या नंतर छोटा ब्रेक आंबडवेट गावा जवळ घेतला , सर्वांनी इंद्र धनुष्य प्रगट झालेला पहिला आणि लागले फोटो विथ सायकल . त्याच जागी icc चे तीन legend गजू , अजित आणि भुजबळ भाऊ यांच्या सोबत एक पॉवरफुल फोटो घेतला . सूर्यास्त झाला आणि हेड लॅम्प , बॅक ब्लिंकर चालू केले ,रस्ता फारसा चांगला नव्हता , कोणी आवाज दिला , पाहतो तर काय आपले शंकर भाऊ होते, त्यांनी मला high elevation सायकलिंग साठी काही टिप्स दिल्या , त्याचा मला भरपूर फायदा झाला पुडील डोंगर घाटातील प्रवास साठी , त्यांचा ऋणी आहे . पुढे मला माझा फॉलोवर ऋषिकेश भेटला , ते असे कि तो मला social मीडिया  follow करत होता आणि माझा पुणे पंढरपूर सायकल वारी ब्लॉग वाचून तो प्रेरित होऊन त्याने रायगड आणि पंढरपूर वारी दोनीही साठी रेजिस्ट्रेशन केले . त्या क्षणी खूप आनंद झाला आणि वाटले कि आपले पण फॅन्स झाले बुवा . हृषीकेश तुला ऑल दि बेस्ट . पुढे चड उतार असे काही रूट्स येत होते , कधी माझा टॉम तर कधी जेरी होत होता . पाऊस झाला होता , वातावरण थंड होते आणि सर्वत्र दाट अंधार , आमचे सर्व काही फ्रंट लैट्स वर औलंबून होते . रस्त्यात माझी उजव्या बुटाची लेस सायकल च्या चेन मधे अडकली , मला तिथेच उतरून लेस कडून , सगळे काही पाहून निघावे लागले .. सुमारे साडे आठ वाजता आम्ही आमचा पहिला मुख्य ब्रेक घेतला , मुळशी च्या सुरुवातीला हॉटेल रिव्हर मध्ये , रिव्हर काही दिसत नव्हती पण आहे असे जाणवत होते .. अजित पाटील यांनी त्यान्च्या गोप्रो नि सर्वांचे इंट्रो शूट केले . आम्ही सर्वांनी चहा आणि गरम वडापाव वरती ताव मारला , राईड लिडर नि सांगितले कि प्रत्येकी दोन वडापाव मिळतील , म्हणून तिसरा काही मिळाला नाही . काही ग्रुप फोटो कडून आम्ही निघताना , आमच्या ग्रेट गजू नि नेहमी सारखे शिकार केले , तिथे पण त्याला कोणी तरी एक सायकलिस्ट भेटला आणि तो गजू ला ओळखत होता . तेव्हा मला कळले कि हा गजू घाबरत का नाही , त्याचे इतके मित्र आहेत कि कधी कुठे त्याला भेटतील हे काही सांगता येत नाही बुवा . अजून एकदा सायकलींचे लाईट्स चालू झाले आणि आम्ही निघालो . आता खरी मजा येणार होती , आता मला कळाले कि लीडर नि दोनच का वडापाव खाण्या साठी सांगितले , कारण पुढे होता बलाढ्य मुळशी चा डोंगर , हवा फूस आणि लीडर ला सलाम . त्या वेळेस माझ्या सोबत भुजबळ साहेब होते, त्यांचा पाय तसा फारसा काही चांगला नव्हता तरी त्यांनी महाराजांच्या प्रेमा पोठी , अतिशय मोठे धाडस करून हि राईड करत होते . मुजरा भुजबळ साहेब , मान गये आपको . नंतर दाट अंधार आणि चड उतार असा आमचा प्रवास चालू . भीती वाटू नये म्हणून सोबत एक शिट्टी आणली होती त्याचा खूप फायदा घेतला , वाटली भीती कि वाजली शिट्टी . काही लोकांनां वाटू लागले कि सायकल वरती ट्रॅफिक पोलीस कधी पासून पेट्रोलिंग करू लागले , वाह मज्जाच . जवळ जवळ आम्ही ६५ km ला आम्ही टाटा पॉवर जवळ सर्वांनी ब्रेक घेतला . सर्व जण बाबाजी आणि काही सायकलिस्ट ची वाट पाहता होते , नांतर कळले कि बाबाजी ला मार लागले होते , त्याची रोड बाईक होती आणि तो खराब रस्त्यामुळे पडला होता , त्याने एका शूर सेनापती सारखे शेवटच्या मामाच्या सायकल स्वार मावळ्याला ला घेऊनच आला , असा लीडर आजच पहिला , सलाम बाबाजी तुला . आम्ही जवळ जवळ १ तास आराम घेतला आणि पुढे सर्वांनी एका अतिशय काही सुपर स्पीड उतारा बद्दल बोलत होते . ते म्हणजे ताम्हिणी नंतर चा होता . तिथे जाता जाता आमचे शंकर पाटील एका रस्त्यात खड्डा आल्याने पडले , मी लगेच पहिले आणि सायकल टर्न करून फ्रंट लाईट टाकली , त्यांना काही जखम नाही कारण त्यांच्या सोबत महाराजांचा आशीर्वाद होता . पुढे सर्वांनी उतार उतरण्यास सुरुवात केली , अगदी एक्दम शिस्तीत सर्व सायकलिस्ट आपल्या लीडर च्या ऑर्डर्स प्रमाणे सायकल चालवत होते . मधेच रात्रीच्या एक च्या सुमारास काही वीकेंड तरुण मंडळी आम्हाला cheer करत होती , ते पाहून असे वाटले कि आपण सायकल T२० च्या स्पर्धेत तर नाही ना ,
छान वाटले आपला चियर झाला म्हणून . आता वेळ अली ती आमचा डे १ थांबण्याची . निजामपूर midc जवळ आमहाला एक शेड सापडले एका रस्त्याच्या बाजूला आणि आमचा डेरा तिथे टाकला , सर्वांनी आपले डिनर काडले आणि लहानपणी शाळेतील आठवण झाली , एक मेकाला डब्बे शेर करून आम्ही जेवण संपिवले, आम्ही आता पर्यंत ९५km प्रवास पूर्ण केला होता . झोपण्या आधी लीडर नि सांगितले कि सकाळी चार वाजता आपल्याला निजामपूर मार्गे रायगड कडे जाणार आहोत . तशी झोप काही येत नव्हती , पण बॉडी पेन असल्याने अराम घ्यावा लागला . पहाट झाली सर्वांनी सकाळचा प्रोग्रॅम केला आणि आम्ही निघालो रायगड कडे . काही जण डायरेक्ट बॅकअप व्हॅन मध्ये बसून घेतले . 

निजामपूर ते रायगड ३३ km चा प्रवास - सुंदर, त्रासदायक आणि वेड लावणारा होता . भरपूर पाणी , घामानी स्नान , ड्रायफ्रुटस मावा चा स्वाद त्याच बरोबर रान मावा करवंदी सुद्धा . प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन मोठे एलेवेशन पूर्ण करावे लागणार होते , पहिले १५ km तर सुसाट चड आणि उतार होते , पक्ष्यांचा मधुर आवाज , शांत आणि सुंदर ग्रामीण जेवण पाहण्यास मिळाला . दुसरे १५ km आले होते पहिले एलेवेशन पूर्ण झाले कि मागून आवाज आला गिरी KOM असा , पहिले तर आपले पाटील साहेब होते ,त्यांनी माझी खूप स्तुती केली , म्हणाले pratice makes you strong , छान वाटले . नंतर काय ते आणि बाबाजी निघाले पुढे आणि बाकीचे काही सायकलिस्ट , मी थोडा माघे पडलो , नंतर माझ्या सोबत लोमटे सर , भुजबळ  साहेब, आणि सुरेश होते . मारली सायकल आम्ही भरपूर , ब्रेक्स पण घेतले , रोड वरती झोपलो , शेजारून एखादी गाडी गेली कि ती येणारी थंड हवा , काय सांगू अतिशय दमट वातावरण झाले होते , पाणी 
संपले होते , भूक लागली होती , दम  लागत होता .... पण पुढे फक्त महाराज दिसत होते आणि म्हणत होते , या लवकर वाट पाहत आहे तुमची गड्यानो . आम्ही चार जणांनी decision घेतला कि आता आपण टाकू आपल्या सायकल्स बॅकअप व्हॅन मध्ये , आमचे १२८km झाले होते आणि फक्त ६ km राहिले होते , आम्हाला माहिती नव्हते कि पुढे १km नंतर सगळा उतार  होता ते . .... सर्व जण पाछाड ला आऊसाहेब जिजाऊ किल्ल्या जवळ पोहचलो . घोषणा झाली "छत्रपती शिवाजी महाराज कि जय , जय शिवाजी जय भवानी " ...... 

परतीचा प्रवास -
स्नान झाले एक मोठ्या विहीरीत , खूप आनंद घेतला . नास्ता झाला देशमुख कॅन्टीन मध्ये , सुंदर पोहे वडा आणि चहा . रायगड वरती जाण्याचे आम्ही टाळले कारण वेळ कमी होता आणि रोप वे ला सहा तास वेटिंग होती . बाबाजी नि आम्हाला शिव इतिहास आणि जिजाऊ वाडा याचे सुंदर माहिती दिली , खूप खूप आभार त्याचे . बस मध्ये आम्ही होतो आमची दुसरी बायको (सायकल ) टेम्पो मध्ये होती ,काय त्या बोलत असतील टेम्पो मध्ये कोणास ठाऊक ,
सर्व बायका नक्कीच आमहाला रागाने काही माहित असतील , कारण मित्रानो हा प्रवास सायकल स्वरांचा होता , घोड स्वारांचाच नाही . मुळशी नंतर आम्ही सर्व जण एक गारवा ऍग्रो हॉटेल मधे थांबलो तेव्हा ३ वाजले होते ,जेवणे झाली आणि आम्ही पुणे शिवतेज नगर ला सायंकाळी सहा वाजता पोहचलो . .... भेटी गाठी झाल्या .... आणि आप आपल्या घरा कडे निघालो . 

धन्यवाद - साहाय्य  टीम चे मनापासून आणि सर्व सायकलिस्ट चे , खूप मज्जा अली राव . 

आपला 
गिरीराज उमरीकर 
#giricycling 
#indocyclistclub 
#raigad #cycleride