० ते ३०,०१० किलोमीटर चा सायकल प्रवास By डाॅ. धनराज हेळंबे

० ते ३०,०१० किलोमीटर चा सायकल प्रवास

१३ डिसेंबर २०१५ ते ५ जून २०१८

Peddling १७८२ तास ४७ मिनिटे

 

     दिनांक १३ डिसेंबर २०१५ रोजी फिटनेस च्या निमित्ताने आणि मुलासाठी घेतलेली सायकल त्याच्या शैक्षणिक कारणामुळे ती तशीच घराच्या एका कोप-यात पडून होती म्हणुन मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चालवायला सुरुवात केली. तसे मी पण शिक्षणासाठी ११ वी ते पदवी पर्यंत सायकल च वापरलेली होती. पण नंतर वैद्यकिय व्यवसायामुळे सायकल चा वापर बंद झाला. १८ वर्षा नंतर पुन्हा फिटनेस साठी सायकलिंग ला सुरवात केली. सुरवातीला एकटाच सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक ते दोन तास सायकलिंग चालू होते. हळूहळू आवड निर्माण झाली तसेच अनेक नवीन मित्र मंडळी भेटत गेली. त्यातच Hunter's group तयार झाला होता त्यातील अनेक सदस्य सायकलिंग करत होते, वेळ मिळेल तसे सायकलिंग चालू होते. माझे पहिले १०० किलोमीटर चे सायकलिंग Hunter's group च्या सदस्यांसोबत आणि माझ्या मुलाबरोबर पवना डॅम ला गेल्यामुळे पुर्ण झाले होते ते ही उन्हाळ्यात. पहिल्या १०० किलोमीटर राइड चा आनंद वेगळाच आणि अविस्मरणीय होता. त्यानंतर Hunter's आयोजित ऑगस्ट मध्ये Raigad bike केले तेंव्हा डाॅ. डोळस सरांना भेटण्याचा योग आला, त्यांच्याशी चर्चा करताना सायकलिंग मधील अनेक event ची माहिती मिळाली.  नंतर ICC च्या अनेक सदस्यांची ओळख होत होती आणि सायकलिंग च्या नवीन विश्वात कसा गुरफटलो ते कळालेच नाही. त्यातच नोव्हेंबर १६ च्या ICC Cyclothon बद्दल माहिती मिळाली तेंव्हा विचार केला आणि त्या event मध्ये सहभागी व्हायचे ठरवले. ICC Cyclothon साठी सराव करते वेळी BRM बद्दल माहिती मिळाली म्हणुन त्यासाठी registration करुन मी आणि आदेश नी AIR no. घेतला. लांब च्या प्रवासाला सुरुवात केल्यामुळे अनेकांनी सायकल upgrade चा सल्ला दिला म्हणुन मुलाच्या सल्याने Montra Blue 1.2 ही नवीन सायकल घेतली. नोव्हेंबर १६ मध्ये १०० किलोमीटर चे ICC Cyclothon यशस्वी रित्या पुर्ण केले. त्यामुळे आपण जास्त अंतराने सायकलिंग करु शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता म्हणुन १० डिसेंबर २०१६ च्या २०० किलोमीटर च्या BRM चे registration केले. BRM चा रुट चांदणी चौक ते पाचवड असा होता, पुर्व तयारी म्हणुन ३ डिसेंबर ला मी आणि आदेश सकाळी लवकरच वाकड पुला खालून हायवे नी राइड ला सुरवात केली पण पुढे खंबाटकी चा घाट पहिल्यांदाच चढत होतो त्यामुळे आम्ही त्या घाटात तिन वेळा थांबलो होतो. त्यावेळी मला माझा खुपच राग आला होता मनात विचार आला कशासाठी आपण इतके मोठे मोठे घाट सायकलिंग करत आहोत पण पुढे घाट उतरून पाचवड गाठले तेंव्हा परत १०० किलोमीटर सायकलिंग केल्याचा आनंद झाला होता तेथेच नाष्टा करुन परतीचा प्रवास सुरु केला आणि संध्याकाळी घरी परत आलो तेंव्हा प्रथमच २०० किलोमीटर सायकलिंग केल्याचा आनंद अविस्मरणीय होता आणि मनात विचार केला आपण BRM करु शकतो. १० डिसेंबर २०१६ ला पहिलीच २०० किलोमीटर ची BRM यशस्वीपणे वेळेत पुर्ण केली आणि एका लाबंच्या अनोख्या सायकलिंग च्या प्रवासाला सुरुवात झाली. यात सातत्य असावे म्हणुन नियमित सायकलिंग चालू होते या दरम्यान सायकलिंग विश्वातील अनेक दिग्गज भेटत होते त्यांच्याकडून सायकलिंग च्या अनेक event बद्दल माहिती मिळत गेली. अनेक वेळा मनात विचार आला की हे सर्व सायकलिंग मध्ये शक्य आहे आणि तेथुन पुढे सायकलिंग हे माझे  Passion कधी झाले मला समजलेच नाही. मे २०१७ मध्ये २०० किलोमीटर ची Night BRM होती त्यावेळी विचार केला एका रात्रीत २०० किलोमीटर सायकलिंग कसे शक्य आहे पण मन म्हणाले चला सहभागी तर होऊ. पुन्हा त्याचा सराव म्हणुन रात्री उशिरा किंवा पहाटेच्या राइड केल्या तो मात्र वेगळाच अनुभव होता. आयुष्यातील पहिलीच २०० किलोमीटर ची Night BRM मी आणि आदेश नी यशस्वीपणे वेळेत पुर्ण केली. त्यानंतर The Deccan Cliffhanger, Pune to Goa Cycle Race (६४३ किलोमीटर) बद्दल माहिती मिळाली आणि त्यात सहभागी होण्याचे ठरवले. पण या सायकल रेस चा मार्ग खुपच खडतर होता एकुण सहा घाट मार्गात होते तसेच नोव्हेंबर ची थंडी पण होती तरीपण सहभागी होण्याचे ठरवले होते. मग काय रेस ची तयारी म्हणुन सराव करण्यासाठी वेग वेगळ्या ठिकाणी उन्ह, वारा, पाऊस, दिवस, रात्र आणि सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात कधी लांबच्या तर कधी जीवघेण्या घाटात सायकलिंग ला सुरवात केली. त्याच वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपण आहे त्या सायकल वर रेस चांगल्या वेळात पुर्ण करु शकत नाही म्हणुन पुन्हा सायकल upgrade करण्याचे ठरवले. १० ऑगस्ट २०१७ ला माझ्या अर्धांगिनी ने Scott ची Road bike तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेट दिली. तेथूनच ख-या अर्थाने माझ्या लांबच्या सायकलिंग ला सुरवात झाली. गोवा रेस चा सराव व्हावा म्हणून मी आणि आदेश नी ४०० आणि ६०० किलोमीटर च्या BRM यशस्वीपणे वेळेत पुर्ण केल्या. नोव्हेंबर २०१७ मध्ये मी, आदेश आणि मालेश नी तिन सदस्यांच्या टिम मध्ये सहभागी होऊन The Deccan Cliffhanger ही रेस प्रथमच सहभागी होऊन कांही चुकांचा सामना करीत ही रेस २४ तास ३९ मिनिटात पहिल्या क्रमांकाने पुर्ण केली. त्यावेळी crew members म्हणुन सुहास, अश्विनकुमार, निलेश, प्रविण आणि विवेक चे जे सहकार्य मिळाले ते अवर्णनीय होते. २०१८ मध्ये काही कारणांमुळे सुरवातीच्या तिन BRM करु शकलो नाही त्यामुळे वर्षाची सुरुवात ६०० किलोमीटर च्या BRM केली. मागच्या वर्षी BRM म्हंटले की आदेश सोबतीला असायचाच पण या वेळी तो मुंबई मॅरेथॉनची तयारी करीत होता त्यामुळे नवीन जोडीदार म्हणुन सिध्दु ला फोन केला आणि दोघे एकमेकांच्या सोबतीने जायचे ठरले. नवीन रुट असुनही ६०० किलोमीटर ची BRM यशस्वीपणे वेळेत पुर्ण केली. फेब्रुवारी मध्ये ४०० किलोमीटर ची BRM पुन्हा सिध्दु सोबत कोल्हापुर पर्यंत आणि परतीच्या वेळी एकला चलो रे अशाप्रकारे यशस्वीपणे वेळेत पुर्ण केली. फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यापासून अर्धांगीचा फिटनेस सुधारण्यासाठी त्यांच्या सोबत सकाळी नियमित पणे सायकलिंग करतो आहे. शनिवार, रविवार कधी BRM, कधी ICC, कधी PEDAL DEMONS तर कधी सायकलिंग च्या निमित्ताने मिळालेली मित्र मंडळी यांच्या सोबत लांब चा सायकल प्रवास चालूच आहे.

       या अडीच वर्षाच्या काळात सायकलिंग करते वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे फिटनेस चांगला ठेवण्यासाठी, कमी अंतराच्या प्रवासाला आणि पर्यावरण रक्षणासाठी सायकल हे एक उत्तम साधन आहे. याच काळात सायकलिंग करते वेळी अनेक आनंदी तसेच अविस्मरणीय क्षण अनुभवले ते अवर्णनीय आहेत. अनेक मित्र मंडळी मिळाले त्यामुळे आयुष्य जगण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. अनेक दिग्गज भेटले ज्यांच्या सोबत राहून सायकलिंग बद्दल एक वेगळीच उर्जा मिळाली. याच काळात अनेक भागातील निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवता आले. तसेच निसर्गाचे रौद्र रूप पण पहायला मिळाले जे कधी दुचाकी किंवा चारचाकी स्वयंचलित वाहनावरुन अनुभवले नव्हते. निसर्गा विषयी मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली त्यामुळे त्या निसर्गाच्या रक्षणासाठी काम करण्याची संधी आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींची जाणीव झाली. याच दरम्यान ० पासून सुरू झालेले सायकलिंग चे आकडे वाढत वाढत कधी ३०,०१० किलोमीटर चे अंतर पुर्ण केले हे कळाले सुध्दा नाही. 

      पुन्हा भेटू या नवीन राइड चे अनुभव कथन करण्या च्या निमित्ताने किंवा अनुभवलेल्या अविस्मरणीय क्षणांत सामील होण्याच्या निमित्ताने.......

 

 डाॅ. धनराज हेळंबे