वाढत्या पेट्रोल दरवाढीसाठी सायकल टू वर्क उपाय !

वाढत्या पेट्रोल दरवाढीसाठी सायकल टू वर्क उपाय !

मागील पंधरवाड्यात पेट्रोल दरवाढ आणि त्यामुळे लोकांचा रोष, समाज माध्यमांवर चर्चा, वाद विवाद मग मोदी, मनमोहन सिंग च्या काळातील दरवाढीचे दाखले वगैरे चर्चा आपण सर्वच अनुभवत आहोत।
नक्कीच एक महत्वाची बाब एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मान्य करतो की कोणतेही सरकार पेट्रोल दरवाढ रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्यात नक्कीच कमी पडली आहे।
हा झाला शासकीय पातळीवरील दोष पण मला नेहमीच वाटते के जेंव्हा आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून सहजपणे आपल्या मूलभूत प्रश्नामध्ये महागाई असो व इंधन दरवाढ झाली की टीका करतो किंवा तोंडसुख घेतो तितक्याच सहजतेने त्या विषयीच्या उपाय विषयी विचार किंवा कृती करतो का ?
आज केवळ एक सायक्लीस्ट म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक म्हणून मी माझे विचार मांडणार आहे. बघा करून पटलं तर....
आपण ज्या गावात राहतो समजा मी परभणीचा अथवा 3 लाख लोकसंख्या असलेल्या गावांचा जिथे सरासरी क्षेत्रफळ 10-15 किमी आहे.
  तर परभणीचा विचार करू जिथेे एक टोक विसावा कॉर्नर ते वरद गार्डन जेमतेम 10 किमी अंतर। जर आपल्याला दिवस भरातील कामे जसे ऑफिस, बँक, दवाखाना, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कार्यालय ला सायकल वर जायचे म्हटले तर जाणे येणे 6-10 किमी एक खेपेत तर कधी 2 खेप झाल्यातर  14-18 किमी अंतर होईल.
आपणांस प्रश्न पडेल कि रोज 20 किमी सायकलिंग ?
काही अवघड नाही कारण बहुतेक आपण सर्वच जण 10 वी किंवा 12 वी ला शाळा, ट्युशन, कलासेस  निमित्त सर्वांनीच दिवसभरात 20 किमी सायकल सहजच चालवली असेल.
सायकल टू वर्क एक चळवळ:  सुरवातीला केवळ आठवड्यातून 2 वेळा जरी आपण आपल्या कामाच्या ठिकाणी सायकलवर गेलो तर 15-20 किमी प्रति दिन प्रमाणे महिन्याला 200 किमी अर्थात 5 लिटर पेट्रोल ची बचत होऊ शकते।
आणि जर रोज कामाच्या ठिकाणी सायकलवर गेलो तर मग काय प्रदूषण, आरोग्याच्या समस्या आणि इंधन दरवाढ सबकी छुट्टी।
काही चांगले उदाहरण आहेत जसे नांदेड येथे श्रीकर परदेशी जिल्हाधिकारी असताना महसूल कर्मचाऱ्यांना अतज्वड्यातून एकदा सायकल किंवा पायी ऑफिस ला येणे आवश्यक होते त्यामुळे नांदेड येथील सायकल ट्रॅक चा पुरेपूर वापर झाला। परंतु दुर्दैवाने त्यांची बदली झाल्यावर लोकांचा प्रतिसाद कमी होत गेला आणि पुढे हेच सायकल ट्रॅक ऑटो आणि कार पार्किंग साठी स्टॅन्ड अनधिकृत जागा झाली आहे।

पुणे, मुंबई, गुरगाव, बेंगलोर, नाशिक, चंदीगड मध्ये हळू हळू सायकल टू वर्क कल्चर वाढत चाललंय। पुण्यातील आय सी सी (इंडो सायकलिस्ट क्लब) चे सदस्य नियमित त्यांच्या ऑफिस, कंपनी ला ये जा करण्यासाठी  साधारणतः रोज 30-40 किमी अंतर सायकलवर कापतात। त्यांच्यात एक प्रकारे सकारात्मक स्पर्धा लागली आहे की स्त्राव्हा, मॅप माय राईड सारख्या गिपीएस ऍप वर कोण नियमित आणि जास्तीत जास्त अंतर कामासाठी सायकलवर कापतो त्याला ते महिन्यातून एकदा बक्षीस देऊन गौरव करतात।
‌हळू हळू नाशिक हे सायकलिंग चे शहर म्हणून नावारूपाला येतेय। नाशिक सायकलिंग ग्रुप चे ज्येष्ठ सायकलिस्ट व पोलीस अधिकारी श्री हरीश बैजल, विशाल उगले, किशोर काळे, महाजन बंधू यांच्या प्रयत्नातून महिला वाहतूक पोलीस, महिला पोलीस हे देखील कामाच्या ठिकाणी सायकल चा वापर करतांना दिसत आहेत।
‌जिंतूर येथील पोलीस अधिकारी श्री मोरे यांच्या प्रयत्नातून रात्रीची गस्त सायकलवर ते पण जिंतूर सारख्या गावातील अरुंद रस्त्यावर घालण्याचा यशस्वी प्रयोग सर्वच ग्रामीण भागातील पोलीस यंत्रानेसाठी प्रेरणादायी ठरू शकतो जिथे रस्ते लहान असल्याने जीप सारखी वाहने पोहोचू शकत नाहीत।
‌पत्रकार आनंद कस्तुरे नागपूर सारख्या मेट्रो शहरात पत्रकारितेसंबंधीत सर्वच कामे सायकलवर करतात। ते साधारणतः महिन्याभरात 1400-1600 किमी सायकल चालवतात ते पण दैनंदिन कामासाठी।
‌माझे मित्र संजय बनसकर शाळेत असो वा इतर सर्वच कामासाठी मागील 15 वर्षांपासून केवळ सायकलवरच फिरतात।
‌मी स्वतः क्लीनिक मध्ये असो व अत्यावश्यक नसलेल्या सर्वच कामासाठी सायकल वरच फिरतो। 6-8 महिन्यापासून असेच सर्वच कामासाठी सायकल वापरल्याने माझी सी डी डिलक्स मोटारसायकल पडून होती। अखेरीस 2 वेळा स्पार्क प्लग बदलल्यावर ती विकून द्यावी लागली. काय करणार वापरच नव्हाता .....
‌शेवटी इतकेच आवाहन करू इच्छितो की जिथे वेळेचे बंधन नाहीे आणि अति तातडीची कामे नाहीत, एकट्याला जायचे आहे किंवा सायकल टू वर्क आहे त्या ठिकाणी सायकलचाच वापर करावा किमान आठवड्यातून 2 वेळा तरी।
‌सायकल टू वर्क कल्चर जोपासण्यासाठी काही प्रयत्न शासकीय स्तरावर देखील व्हावेत जसे
‌1) प्रत्येक गावात जिथे रस्ते मोठे किंवा हायवे अथवा अति रहदारीचे त्या ठिकाणी सायकल ट्रॅक असावे।
‌2) सायकल ट्रॅक वर केवळ सायकल या वाहनास अनुमंती देऊन इतर वाहने त्याचा वापर अथवा पार्किंग साठी वापर करत असतील तेथे मोठा दंड अकारून अश्या वाहनांना प्रतिबंध करावा।
‌3) शासकीय कार्यालय, बँक, बस स्टॅन्ड, स्टेशन, थिएटर, मॉल अश्या सर्वच ठिकाणी सायकल साठी पार्किंग ची योग्य सोय असावी। अनेक वेळा मोठे मॉल, हॉटेल्स, कार्यालयात सायकलला अडगळीच्या ठिकाणी पार्किंग ची जागा दिली जाते।
‌4) विविध क्रीडा प्रेमी, पर्यावरण प्रेमी स्वयंसेवी संघटनांनी सायकलिंग विषयी शाळा, कॉलेज, जॉगिंग ट्रॅक अश्या ठिकाणी जनजागृती करून जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक सायकल चा वापर करतील यासाठी विविध प्रोत्साहनपर उपक्रम घ्यावेत।
‌पालकांनी देखील 10, 12 वी च्या विद्यार्थांना स्कुटी अथवा गाडी साठी स्पष्ठ नकार देऊन सायकलिंग विषयी प्रोत्साहन द्यावे। त्यांना गाडी ऐवजी चांगल्या आधुनिक गियर च्या सायकल घेऊन दिली तरी एक प्रकार प्रोत्साहन होईल।

‌शेवटी वर मी उल्लेख केल्याप्रमाणे जर आठवड्यातून 2 वेळा प्रमाणे एक व्यक्ती महिन्याला 5 लिटर पेट्रोल वाचवू शकला तर एक तर त्याला चांगले आरोग्य, पैशाची बचत, प्रदूषण मुक्त पर्यावरण मिळेल। आणि जेंव्हा हि चळवळीत एक व्यक्तीपासून शेकडो, हजारो, लाखो लोक सामील होतील तेंव्हा नक्कीच पेट्रोल च्या किमती आज 88 वरून 65 पर्यंत नक्कीच येतील अशी अपेक्षा करू।

‌चला येतात ना उद्यापासून ऑफिस ला सायकलवर

‌डॉ पवन सत्यनारायण चांडक
9422924861