चला सायकल वारी करूया ICC सोबत  चलो पंढरपूर ( Giri Blog )

!!! चला सायकल वारी करूया ICC सोबत - चलो पंढरपूर !!!

पंढरपुरी पायीवारीचा थोडक्यात इतिहास -

१ मे १६६० (Google Source) पासून रूढ झालेली महाराष्ट्राची “ओळख” जागृत असली तरी , महाराष्ट्राची “आत्मखूण” मात्र शेकडो वर्षांची आहे, “जावे पंढरीसी,आवडी मनासी” म्हणत ती आत्मखुण “वारकरी” जपतोय. भक्ती, श्रद्धा, आस्था आणि निश्चय या मानवी भावनांचा सामुहिक आविष्कार म्हणजे वारी. माणसाचे माणसाशी रक्तापलीकडचे नेमके काय नाते आहे ते वारीतच समजू शकते. वारकरी आणि विठ्ठल यांचे नाते निखळ प्रेमाचे. संतांच्याबरोबर श्री विठ्ठलाच्या नामचिंतनात त्या विठ्ठलाकडे केवळ प्रेमचं मागण्यासाठी निघालेल्या प्रेमळ भक्तांचा मेळा म्हणजे वारी.

सायकल वारी ला प्राधान्य का ? (विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न)... वाचा माझ्या शब्दातून !!!

मराठी माणसांची प्रमुख ओळख काय असेल तर ती एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे “पंढरीची वारी”.

दरवर्षी वारी पहिली कि निष्ठा , प्रेम , करुणा यांचा प्रतयय नेहमी येतो . वारकरी लोकांचे विठ्ठला वरच अलोनात प्रेम , निष्ठा , पायात काही न घालता शेकडो मैलाचा प्रवास , रिंगणामध्ये दंग होऊन स्वतःला झोकून देणं , हे पाहून माणूस हेलावतो आणि थक्क होऊन पाहतच बसतो . ही येवढी उर्मी कुठून येत असेल , हा ड्रायविंग फोर्स कुठून येत असेल , मला पण हे अनुभवायचे आहे याचा निश्चय मी दर वर्षी करायचो , पण तो कधी सार्थकी लागला नाही . कारण ऑफिस मध्ये दोन आठवडे सुट्टी मिळेल का , शिव धनुष्य उचलतोय तो खरच पेलवेल का आणि सर्वात महत्वाचे बायको काय म्हणेल , असे असंख्य प्रश्न मनावर गरुडा सारखे गिरट्या घालत होते . वारी बद्दल कायमच माझ्या मनात एक अनामिक प्रकारची असूया आहे , हि असूया दूर करण्यासाठी २०१७ ला पुणे ते पंढरपूर सायकल वारी केली व मी सुखावलो . माझी दुसरी बायको जिच्यावर मी पहिल्या बायको एवढेच प्रेम करतो - ती माझी सायकल हिने मला तेव्हा साथ दिली . विठ्ठलाच्या मनात होते कि मी वारी करावं , तशी हि सायकल विठ्ठलासारखी माझ्या साठी धावून आली . !!! माउली माउली !!!

मला विचारलं तर सर्वात मुख्य कारण ह्या पुणे पंढरपूर सायकल वारी चे असे कि , काही वर्षा पूर्वी माझ्या वडिलांचा स्वर्गवास झाला तोही वारी च्या पहिल्या दिवशी अष्टमी ला पुणे येथे . तर ठरविले कि आपण हि सायकल वारी करावीआपल्या आरोग्य साठी , वडिलांच्या इच्छे साठी आणि म्हणले तर ताण तणाव दूर करण्या साठी . तर हि काही कारणे सायकल वारी ला माझा दृष्टीकोणातून प्राधान्य देते . जय जय राम कृष्ण हरी - सायकल करी गिरी झाला वारकरी !!!!

तसं पाहिलं तर,

माझ्या “बा” अगोदरही मी कोणत्या“बा”ला मानत असेल तर ते म्हणजे “ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबाला” .

ज्ञानियाचा वा तुक्याचा वंश मात्र आपण आहोत. आणि राहू. या वर्षी सायकल वारीत भेटूच - ७ जुलै २०१८

ICC पुणे पंढरपूर सायकल वारी २०१७ - अनुभव

मी नुकतीच सायकलिंग चालू केलेलं २०१६-१७ ला ,काय ते बेगिनर सायकलिस्ट होतो मी आणि बरेच मित्र . धाडस केला आणि जॉईन केला वारी ग्रुप . मी विठ्ठलावर आणि माझे सिनियर सायकलिस्ट मित्र ग्रेट गजू आणि अजित यांच्या सपोर्ट नि . आकुर्डी ते हडपसर आणि पुढे हडपसर ते पंढरपूर असा एक दिवसात पंढरपूर गाठले , लगबग २३०km १२ तास सायकलिंग आणि काही ब्रेक्स नास्ता , चहा , पाणी आणि दुपारचे जेवण इंदापूर कॉर्नर येते . सोबत माझ्या कंपनीतील सायकलिस्ट मित्र , icc सायकलिस्ट आणि हडपसर येथील सायकलिस्ट होते . बरेच नवीन सायकलिस्ट मित्र झाले या वारीतून . अजून एक अनुभव असा कि भूक लागण्या आधी काही खा आणि तहान लागण्या पूर्वी पाणी नक्की प्या , थकल्या सारखे वाटत असेल तर ५ ते १० मिनिटाचा ब्रेक नक्की घ्या , सायकल चालावताना उतार आला तर रिलॅक्स होऊ नका आणि चड आला तर उतरू नका हळू हळू कमी गियर वरून प्याडल मारत जा , कारण पुढे उतार मिळणार आणि चेहऱ्यावर आनंद नक्की - जय हरी विट्टल !!! दुपारचे जेवण झाले कि आम्ही बरेच जणांनी शुगर चॉकलेट्स इस क्रीम खाऊन , बॉडी शुगर लेवल नॉर्मल केले . जेवण्याचा जागी हॉटेल मालकांनी अराम करण्यासाठी १ खोली पण दिली , त्या मुळे बॉडी स्ट्रेस कमी झाले . शेवटचा अकलूज चा प्रवास पण खूप छान झाला आणि अखेरीस ३०-४० km पंढरपूर च्या अलीकडे खूप जोरदार पाऊस झाला , आम्ही सर्व सायकलिस्ट एका शेतात शेड खाली ब्रेक घेतला , मग पाऊस आणि वडापाव हे सुख आम्हाला सध्या झाले , गावातील पुढारी चे पत्रकार यांनी आमचा पाहुणचार केला आणि मीडिया रिपोर्टींग पण , एवढा प्रवास पाहून त्याने याला ब्रेकिंग न्यूज करून टाकली , हाहाहा !!! पंढरपूर ला पोहोचलो आम्ही , विठू राया आमची जणू वाटच पाहत होता असे वाटू लागले आणि खरे पण असेल . आगोदरच राहण्याची जेवणाची आणि झोपण्याची सोय केली असल्याने काही त्रास झालाच नाही . रात्री स्नान गप्पा जेवण करून लांब पाय करून धाराशाही झाले . काही जण जे परतीचा प्रवास दुसऱ्या दिवशी करणार होते कयसाले नि त्यांनी पहाटे दर्शन घेऊन निघाले पुढे , आम्ही काही जण बॅकअप टेम्पो मधे luggage सायकल्स लोड करून त्यांना गाठलो पुढे .. थोडक्यात असा होता वारी २०१७ प्रवास , म्हणूनच म्हणतात एकदा वारी करून पहा मग दरवर्षी कराल , नक्की - जय जय राम कृष्ण हरी !!!

सायकल वारीची तयारी -

मग काय इंडो सायकलिस्ट क्लब यांच्या सोबत असलेला सायकलिंग चे रूपांतर सायकलवारी मधे झाले . तुम्ही जर रोज सायकलिंग करत असाल तर हे शक्य आहेच , म्हणायचं झाला तर तासि वीस कमी अंतर पार करत असाल तर तुम्ही हि वारी सहज करू शकता . मुख्य म्हणजे जास्त वेळ सायकल सायकलिंग चा अनुभव मिळवा , काही लांब पट्ट्याचे फेरफटके मारून प्रॅक्टिस करा , जर तुम्ही सहा तासात १०० km करत असाल तर तुमहाला विठू राया नक्की मिळणार आणि तेही पंढरपुरात . आपल्याला काही सायकलिंग च्या वस्तू असणे गरजेचे आहे (सायकलिंग शॉर्ट्स , ड्रायफिट शर्ट किंवा जर्रसी, पाणी बाटली रॅक सहित , फ्रंट आणि बॅक लाईट, पाऊस पडण्याची शक्यता असणार तर रेनकोट , कॅप , मोबाइलला कव्हर , सायकलिंग करताना काही ड्रायफ्रूट energy बार इत्यादी सोबत ठेवा ).

ICC पुणे पंढरपूर सायकल वारी २०१८ चे आकर्षण -

१. ऍडव्हान्स प्लांनिंग

२. अनुभवी सायकलिस्ट मोठ्या प्रमाणात , नवे सायकलिस्ट भरपूर

३. K२K , P२P , आयर्न मॅन आणि ULTRA मॅरेथॉन रुंनर्स

४. दोन्ही वेळेस बॅकअप वेहिकल सपोर्ट आणि हैदरशन

५. जमलेच तर सायकल रिंगण करू , कीर्तन करू

........ अजून काही असणार , जसे जसे आपण ७ जुलै जवळ जाऊ !!!!

मग काय विचार करता , मी ICC पुणे पंढरपूर वारी २०१८ साठी नोंदणी केली आहे तुम्ही पण करा आणि व्हा वारकरी काही दोन दिवसासाठी तरी .

आपला,

गिरीराज उमरीकर ( #GIRICYCLING )

#INDOCYCLISTCLUB

#सायकल_करी_झाले_वारकरी

#पंढरपूर_वारी

#ICC_WARI #ICCGOGREEN