मी आणि माझी सायकल By Shri. Mohan Karpe Sir

मी आणि माझी सायकल 

कोणी व्यायामासाठी सायकल चालवतं,  कोणी इंधनामुळे होणारं  pollution होऊ नये म्हणून, तर कोणी पैसे वाचवावे म्हणून सायकल चालवतात

मी का सायकल चालवायला लागलो ?

10 वर्षा पूर्वी सर्वत्र चर्चा असायची की पेट्रोलचे साठे संपत आले आहेत, इंधनाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढणार ,त्यावेळी माझ्या मनात आलं, त्यावर  सायकल चालवणे उत्तम पर्याय होऊ शकतो.त्या वेळी माझे वय 50 चे पुढे होत.आणि मी जर आत्ताच सायकल चालविण्यास सुरवात केली तरच, ती साठी नंतर ही सायकल चालवू शकेल ,हे लक्षात आलं,तशी शाळा काँलेज मधे असताना भरपूर सायकल चालवत असे,

 मधल्या काळात अजिबात चालवली नव्हती, आता परत पहिल्या सारखे जमेल का अशी शंका होती, पण प्रयत्न तर करायला च हवा होता,आणि ठरलं 2009 नोव्हेंबर मध्ये पहिली सायकल विकत घेतली हिरो कंपनीची मोनो गियर ,रोज 15 ते 20 कि मी सराव सुरू झाला,सुरुवातीला थोडा त्रास होत असे, पाय दुखायचे पण ते काही दिवसच ,मला दम्याचाही त्रास होता, cholesterol high असायचे, जसं सायकल चालवणे सुरु झाले तसे,माझ्या प्रक्रुतिमधे सुधारणा होऊ लागली,वजन 80 किलो च 75 किलो वर आले.सहा महिन्यात रक्त तपासणी केली, cholesterol जे नेहमी खूप high असायचे ते रिपोर्ट नाँर्मल आले,दम्याचा त्रासही कमी झाला चालु असलेली सगळी औषधे हळूहळू बंद झाली, आणि माझे सायकल वर प्रेम अधिकच वाढत गेले पुढे पर्यावरणावर काही पुस्तके वाचण्यात आली,त्यातुन कळलं ,पेट्रोल, डिझेल च्या वाहनांमुळे वाढणारे पोलुशन, त्यामुळे हार्ट आणि लंन्ग डिसीज व कँन्सर सारख्या आजारांमधे  मोठ्या प्रमाणात झालेली वाढ,तसेच आतां खुप चर्चेत असलेला विषय   ग्लोबल वाँर्मिग, ज्यामुळे वातावरणात झालेले बदल, वाढलेले तापमान, पावसाचा अनियमित पणा दुष्काळ ,ज्याचे प्रमुख कारण आहे वहानांच्या इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणातील कमी होणारा प्राणवायू (O2) आणि    CO2 चे वाढणारे प्रमाण हे सगळं जेव्हा समजले तेव्हा कोणतीही गाडी चालविताना एक थेंबही पेट्रोल जाळले तरीही मला मी पाप करतोय असं वाटायला लागलंआणि माझ सायकलवरचं प्रेम अधिकच वाढत गेलं.

2011मार्चमधे २४speedची (8×3) Schwinn company ची (21000₹) imported सायकल घेतली ,त्यावेळी सायकल येवढ्या किमतीच्याही असतात हे माहीत नव्हत, दुकानात गेल्यावर कळले की सायकल जर कार्बन फायबरच्या घेतल्या तर एक लाखाचे पुढे अगदी 8 लाखाच्याही असतात अर्थात ज्यांना स्पर्धेत भाग घ्यावयाचा असतो त्यांना अशाच सायकली घ्यावा लागतात, माझा सायकलींगचा सराव साधारण 20 किमी रोज चालूच झाला. एक दिवस सुनील ननवरे भेटले त्यांनी मला ICC च्या WhatsApp ग्रुप मधे  add केले (एप्रिल 2015)  तिथे सुनील ननवरे, सुनील पाटील सर,गजानन खैरे(गजू),अजित पाटील,अतुल माने, विशी ,अमित खरोटे,अविनाश,भुजबळ, याचे बरोबर ग्रुप राईड करण्याची संधी मीळाली,त्यांचे कडून खुप शिकायला मिळाले,आणि 20 किमी चे अंतर 50 किमी कधी झाले ते कळले च नाही 

कधी सिंहगड कधी भंडारा हिल,मग पानशेत धरण,लवासा,भामचंद्र गड अशा सफरी  करता आल्या, सायकलींग चा आनंद कसा घ्यावा हे शिकलो

 आणि 100-120 किमी चा पल्लाही पार केला.

By Shri. Mohan Karpe Sir