"मंतरलेले 13 तास" पुणे -गोवा रेस दिवस पहिला!

वाचण्या आधी काही सुचना
एकूण वर्णन 13 तास
एकूण अंतर 260 किलो मीटर
एकूण लिहायला लागलेला वेळ 10 तास
एकूण वाचायला लागणार वेळ किमान अर्धा तास
एकूण तेवढा वेळ ठेऊन, सगळंच वाचा तर मजा !
एकूण वेळ सांगणे हे निमित्त,बाकी ही सगळी पण मजा !

"सरफरोशी तमन्ना आज हमारे दिल मे है !
देखना है जोर किताना बाजुये कातिल मे है !"

इंडो सायकलिस्ट क्लब म्हणजेच ICC
ही फक्त नावापुरती एक संस्था आहे .
खर म्हणजे हा एक परिवार आहे ,एक उस्फुर्त परिवार !
समाजातील प्रत्येक बंधू ,भगिनींचे स्वास्थ उत्तम राहावे या करिता सायकलिंग ,रनिंग ,आणि स्विमिंग चा आदर्श ," आधी स्वतः केले आणि सांगितले" या उक्ती नुसार संपूर्ण समाजा समोर ठेवणार एक स्पिरिटेड परिवार .पुण्यातच न्हवे ,महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात ICC ने आपल्या कामाने आणि प्रेमाने एक नेटवर्क तयार केले आहे जे कुठलाही 3g,4g पेक्षा ही जास्त स्ट्रॉंग आणि मजबूत आहे .
याचा प्रत्यय सगळ्यांनाच 2आणि 3 डिसेंम्बर ला आला.निमित्त होते
"काँकेस्ट द गोवा"
भारतातील पाहिली "सोलो स्टेज" दोन दिवसीय रेस! ज्याच्यात अंतर गाठायचं होत 500km
हो बरोबर ऐकलत !
500 km ,दोन दिवस , आणि गोवा !
म्हूणच तर म्हणवस वाटलना
सरफारोशी की तमन्ना आज ssssss ssss!
खरोखर ज्यांना स्वतःची ताकत आजमावून बघायची होती त्यांचा साठी एक अप्रतिम आव्हान!
ICC आणि डिकॅथलॉन यांनी एकत्रित पणे या रेस आयोजन केले.रेस चे दिवस ठरले 2 आणि 3 डिसेंबर मग काय ICC मध्ये एकच लगीन घाई उडाली आणि ICC चे हजार हाथ कामाला लागले .या परिवाराच खास वैशिष्ट्य म्हणजे कारेक्रम कुठलाही असो प्रत्येक जण मदतिला धावून येतोच. मग प्रत्यक्षात त्या दिवशी जाणाऱ्या टीम चा तो मेंबर भाग असो वा नसो ,
प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने मदत आणि काम करत असतो .
एरवी फक्त ग्रुप मध्ये वर्कआउट पोस्ट केल्यावर ग्रुपवरच भेटणारे दादा,साहेब, मित्र, काका,भाऊ,अप्पा,काय ओ, आणि इतर सगळेच प्रत्यक्षात टेबल भवती जमून जोमाने तयारी सुरू होते .अक्षरशः घरातील लग्न बाजूला ठेऊन हे "गोव्याचे" लग्न लावायला सगळे जण सरसावले .
ICC करीता पण हे एक आव्हानच होते .
आता पर्यंत
"हाईक ऐन बाईक" ,
" सिहगड हिल मॅरेथॉन ",
"भक्ती शक्ती सायक्लोथॉन "
या कारेक्रमाचे आयोजन ICC ने लीलया पार पाडले होते .पण आता आव्हान गोव्याचे होते .आपला
बालेकिल्ला सोडून 500 km वर हे सगळे बिनचूक पार पडायचे होते .
रुठ रेकी,मॅपिंग,हायड्रेशन पॉईंट,सेफ्टी ,रोड सपोर्ट,मेडिकल सपोर्ट,टेकनिकल सपोर्ट,रिपेयर्स , खान पान, फोटो,विडिओ,मीटिंग, बिब पासून ते फायनल टच पर्यंत बापरे बाप! एक ना हजार गोष्टी .लग्न परवडले असे म्हणयाची वेळ आली.
पण मदतीला होते स्वयंसेवकांचे हजारो हाथ, जी ICC ची खरी ताकत आहे .आणि विणलेले प्रेमाचं भन्नाट जाळे .या नेटवर्क मधून कोणीच सुटले नाही पार साताऱ्याच्या टीम पासून ते बेळगावच्या टीम पर्यंत. सगळेच सज्ज होते हे आव्हान पेलायला.
4 मोठ्या गाड्या ,3 बुलेट साधारण 20 जणांची टीम आणि आपली जिगर आजमवायला आलेले 21 नामवंत सरदार सज्ज झाले एक इतिहास घडवणाऱ्या रेस साठी आणि या सगळ्याचा महामेरू होता दहा वर्षीय "अक्षय सांगळे " नावाचा " लिटिल वंडर " !
हो हो आपण बरोबर ऐकले दहा वर्षीय अक्षय सांगळे ज्याने ही रेस जिगरीने पूर्ण पण केली.
मुहूर्ताचा दिवस उजाडला 2 तारीख सकाळी सव्वा पाच वाजता डेकॅथलाँन वाघोली येथे रेपोर्टिंग आणि 5.45 ला फ्लॅग ऑफ.
मी राहायला चिंचवडला, म्हणजे साधारण 35 km अंतर रेस च्या आधीच मारावे लागणार ,बापरे आणि महत्वाचे म्हणजे दोन तास आधी म्हणजे 3 ला वगरे निघावे लागणार होते .
पण ते पूर्व जन्माची पुण्याई का काय म्हणतात ना ती कामी आली .आणि म्हणूच राजेश शेट्ये, केदार देव या सारखे मित्र ,देवाने लहानपणा पासूनच आयुष्यात सोबतीला दिले .माणस जोडणं खूप महत्वाचे आहे .
आणि या बाबतीत ,मी तर नक्कीच जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे .कारण जागोजागी ही प्रेमाची मंडळी मदतीला ,सोबतीला ,सपोर्टला, प्रेमाने धावून आली.
मग ते माझे कुटुंबीय असो,सर असो ,सगळे स्वानंदी असो ,माझ्यावर अतोनात प्रेम करणारी सगळी मित्र मंडळी ,असो आसवरी ताई आणि संपूर्ण जेरे कुटुंबीय असो ,
कोल्हापूरची गॅंग असो,संतोष दादा असो ,अक्षय असो नाहीतर बालपणीचा माझा मित्र अमित पाटील असो या सगळ्यांना भेटलो बोललो तरी दिवस भराचे परिश्रम कुठच्या कुठे पळून जायचे .
"आयुष्यात सायकल चालवा अथवा नाका चालवू पण जीवाभावाची माणसे नक्की जोडा" !
तर राजेश, केदार आणि प्रवीण ही त्रिमूर्ति मला सोडायला म्हणून पहाटे चारलाच राजेशची मोठ्ठी गाडी घेऊन घरा समोर हजर .एवढंच नव्हे तर राजेश आणि केदार खास मला घ्यायला आणि कौतुक करायला म्हणून दुसऱ्या दिवशी थेट गोव्याला येऊन धडकले .केदार तर येताना सकाळी सगळ्या साठी चिक्की घेऊन आला आणि रेस सुरू होण्या आधी प्रत्येकाला शुभेच्छा बरोबर मस्त चिक्की दिली .आनंद वाटायला ओळखीची गरज नसते ते फक्त मर्मबंधात असावे लागते.
कुठलाही रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नात डोळ्यात चटकन पाणी काढत आणि तेवढच पटकन पुसायला पण येत.
अभिमान आहे मला या दोघांच्या मैत्रीवर .म्हणूनच राजेशच्याच गाडीतून परत येताना माझ्या या भिजलेल्या आठवणींना लिखाणाच्या स्वरूपात मूर्त रूप देणायचा हा माझा छोटासा प्रयत्न ( कदाचित ) जरा मोठा होईल.
तर अश्या प्रकारे 2 तारखेला पहाटे 4 वाजता घरासमोर या त्रिमूर्ति आणि आमच्या सौ ,यांच्या बरोबर फोटो काढून मोहिमेला निघालो .बरोबर हॊते सगळ्यांचे आशीर्वाद ,शुभेच्छा आणि साक्षात देव बाप्पा मग काय भीती.
पहाटे 5 च्या आसपास डिकॅथलाँन ला पोहचलो बोचऱ्या थंडीत देखील कमालीचं चैतन्य होते .
या 21 सरदारांना निरोप द्यायला त्यांचे मित्र मंडळी, आप्तेष्ट आणि सायकल प्रेमी आलेले होते .
हाय हॅलो झाले रेपोर्टिंग झाले स्टॅम्प कार्ड घेतले आणि सगळेच स्टार्ट लाईन जवळ गोळा झाले .एका एकाच नाव पुकारलं गेले आणि सगळे एका मागे एक थांबले. तेव्हा लक्ष्यात आलं या 21 सरदारान मध्ये mtb वाला मी एकटाच होतो .मग जोरदार "गणपती बाप्पा मोरया" झाले आणि हे सगळे सरदार वाघोलीहून निघाले .


प्रत्येकाच्या डोळ्यात काहीना काही स्वप्ने ,सायकलच्या बँक लाईट प्रमाणे लूक लुकत होती. वाघोली,येरवडा,संगम ब्रिज ,डेक्कन मार्गे नव्या पेठेतून सिहगड रोड मार्गे बंगलोर हायवे पकडून आम्ही पहिल्या पडावाच्या दिशेने निघालो.
पाहिला पडाव कोल्हापूर च्या पुढे ,कागल जवळ हॉटेल गारवा.पहिला चेक पॉईंट खंबाटकी साधारण 90km दुसरा चेक पॉईंट सातारा 130km च्या आस पास ,तिसरा चेक पॉईंट साई इंटरनॅशनल कोल्हापूरच्या अलीकडे 220 च्या आसपास आणि शेवटी
"हॉटेल गारवा " सगळ्या अर्थाने " गारवा" .
सकाळी वाघोलीहून निघालो मिट्ट अंधार आजूला कोण, बाजूला कोण, पुढे कोण, मागे कोण काहीच माहित नाही .थोडा वेळ बरोबर आलेल्या मित्रांचे चिअर ऐकू येत होते .मग हळू हळू त्या गाड्या आणि दुचाकी वेगवेगळ्या वळणावर टर्न घेऊन निघून गेल्या आणि मग उरली एकाच दिशेने जाणारी लूक लुकणार्या बॅक लाइट ची एक रांग. जो तो आपल्या आपल्या कुवती नुसार मागे पुढे होता ,पण शेजारून पुढे जाणाऱ्या प्रत्येक भिडूला सगळेच जण चिअर करत होते .प्रत्येकाची गणित वेगळी कोणाला स्पीड काढायचा होता ,तर कोणाला एव्हरेज नीट ठेवायचा होता ,कोणाला फुल्ल स्पीड मध्ये लीड घ्यायचा होता तर कोणाला एनेरजि सेव करत लांब पल्ला गाठायचा होता.
माझं मात्र तस न्हवते सायकलिंगच्या बाबतीत जमतेम
सहा महिन्यांचा छोटा बाळ मी.रेसचा सात दिवस आधी अजित दादाना विचारलं,
दादा मला वाटतंय जावं काय करू?
जमेल का मला ?उगाच लहान तोंडी मोठा घास नाहीं व्हायचा? तुम्हाला वाटतय ना करा बिनधास्त अशी लगेच भक्कम थाप त्यांनी मारली !काहीही होऊदेत आम्ही आहोत ना ! नाहीच जमल तर आणू तुम्हला सायकल सकट उचलून. तुम्हाला वाटत असेल तर जा बिनधास्त! तरी विशीशी एकदा बोला.
तो तर काय मुळातच विस्फोटक " मार दो "!
बस्स एवढंच, एकदम क्लिअर है!
तर अश्या प्रकारे या दोन महारथिनच्या पाठबळावर आयुष्यातल्या पहिल्या रेस ला ,आणि ते पण 500 km, आणि ते पण दोनच दिवसातच ,सहभागी झालेलो.
दोन्ही दिवस अंतर पूर्ण करण्या साठी कमाल वेळ 13 तासांची होती.माझं पाहिलं उद्दीष्ट हे अंतर स्वतः सायकल वरच पूर्ण करायचं ,दुसरं ते दिलेल्या वेळत करायच ! बस्स खल्लास ! बाकी सगळे ,मी अवघड पेपरला आपण जास्तीत जास्त प्रश्न
ऑपशनला टाकतो ,तस ऑपशनला टाकून दिल .
मग काय आपली योजना एकच
"धर हँडल आणि मार पॅडल"
त्या योजने नुसार मी पॅडल मारत होतो आता फक्त मी माझी सायकल आणि खंबाटकी. मी ठरवले होत काहीही झालं तरी 10 च्या आत खंबाटकी गाठायच. म्हणजे ऊन वाढायच्या आत घाट संपवायचं यानंतर जात राहू हळू हळू अश्या विचाराने सर्वात शेवटी असलेला मी सकाळच्या वातावरणच आनंद घेत सायकल मारत होतो डेक्कन पर्यंत पोहचलो आणि मागून जोरात
"हान गाव वाले" अशी अजित दादांची पहिली आरोळी आली.घामाच्या पहिल्या धारेने भिजलेल्या शरीरात परत एकदा जोरदार जोश, उगाचच पायांचा स्पीड वाढला.गावातली गर्दी हळू हळू मागे पडून आम्ही हायवे ला लागलो कात्रजचा पहिलाच चढ हा रुतत रुतत जातो हळू हळू ,आणि मग सायकल पण हळू होते आपोआप ,आपण फक्त खाली मान घालून मारत राहायचं पुढे साधारण 5 km पर्यंत कोणी दिसत न्हवते आणि मागे कोणी असायचं प्रश्न नाहीच पण एखाद्याला एकट सोडलं तर ते ICC कसलं ,
दादा ssss म्हणत हाजी मागून आला ,
महाराज जसे शत्रूंना खिंडीत गाठायचे ना तसा हा मला कायम चढा वर गाठतो आणि हसत हसत पुढे जातो त्याच्याशी बोलता बोलता पुढे गेलो .हा 5000 cc पुढे असलेल्या एका BRM वाल्याला गाठतो बघा ,असे
म्हणत हा गेला पण आणि त्या रोड बाईक वाल्याला एन
चढावर गाठून डायरेक्ट बोगद्यात पोहचला .अजब रसायन आहे हा पठ्या केवळ सोबत म्हणून 200 km सायकल मारत खंबाटकी पर्यंत आला.
मी आपला बोगद्याच्या अलीकडे अगदी हळू होत होतो तोवर अजय आला आणि दादा मस्त मस्त म्हणत पार बोगद्या पर्यंत साथ दिली.
हुश्श किमान पहिली टेस्ट तरी झाली बोगदा क्रॉस झाला आता लक्ष खंबाटकी .
साधारण दोन तास झाले होते वातावरणातील गारव्याचा फायदा अजून मिळत होता .रस्ता सरळ आणि मस्त होता पहिल्या चेक पॉईंट शिवाय थांबायचं नाही हे पक्के ठरवले होत साधारण खंडाळ्याच्या आसपास काही भिडू दिसले ! वा वा ,म्हणजे आपण फार मागे नाही आपोआप पाय फिरू लागले आता वर बघायचेच नाही घाट सुरू झाला,
गेर खाली आले,
मुंडी खाली आली आणि
जायचे मात्र वर होते.
अतिशय नगण्य वेगाने मी घाट चढत होतो गुरगुरत जाणार एखादा ट्रक पुढच्या वळणावर गेरचा अंदाज चुकला की आपल्या बरोबर यायचं मग आपण पण त्याच्या वर गुरगुरल्याचा फील घ्यायचा ,एखादी तरुणी कौतुकाने मागे वळून बघतीये असे वाटले की उगाच एखादे वळण लै स्पीड मध्ये मागे पडायचं ,अश्या भौतिक गोष्टींत स्वतःला अडकवून दत्त मंदिरा पर्यन्त पोहचलो होतो पण अजून दोन वळणे बाकी होती
शंकर दादा गाढवे समोर होते दोघे एकमेकांना सपोर्ट करत अजून एक वळण संपवलं आता शेवटची खिंड, पाय मारण्याचा प्रयत्न थांबतो की काय असे वाटणार तेवढ्यात अजित दादा समोरून नाचतच आले त्याना बघून ती खिंड कधी पार केली मला पण कळले नाही.
सगळे खूप खुश होते दादानी खंबाटकी मारला .
रॉक आला कार्ड वर स्टॅम्प दिला पहिलाच स्टॅम्प त्याच्या सारख्या दमदार माणसा कडून मिळाला .
मग पाणी ,केळं ,एनराजल सगळे झाले ,फोटो झाले .


मला खूप भारी वाटत होतं करण मी घाट पूर्ण केल्याचा आनंद सगळ्यानाच खुप झाला होता .
अजित दादाच्या डोळ्यात काळजी आणि अभिमान स्पष्ट दिसत होता फार वेळ घालवू नका निघा आता लवकर असा आदेश आला, आणि मग शंकर * 2
म्हणजेच शंकर गाढवे आणि शंकर उणेचा दोघे फोटो बिटो काढून निघाले .
आहाहा !!!!
उतारावर जे सुख आहे ना ते जगात कुठे नाही. सायकल वर जर कुठे सुख आहे,
तर ते ,
उतारावर आहे ,
उतारावर आहे ,
उतारावर आहे !.


आणि मग त्या सुखात पुढचा तास भर सहज निघून जातो. आता सातारा दुसरा चेक पॉईंट ,सातारा क्रॉस केल्यानंतरच्या चढावर जरा कसरत झाली कारण अकरा साडे अकरच ऊन आता सतवायला लागले होते जणू काही पुढच्या परीक्षेची ती नांदी होती . लांब चढच्या शेवटी चेक पॉइंटची टीम दिसत होती आणि जणू सगळ्यांच्या नजरा आपल्या कडेच आहे असं वाटायला लागलं मग काय पूर्ण ताकत लावून पॅडल मारायला सुरुवात सूर्य बरोबर माथ्यावर आला आणि मी चेक पॉईंटला. सातारच्या टीम ने मस्त सँडविच देऊन भूक भागवली डॉक्टरांनी रस्त्यावरच झोपवून काय काय स्ट्रेच करून घेतल .जरा बार वाटले, पाण्याचं दोन बाटल्या संपवल्या आणि निघण्याची तयारी केली.

भर दुपारी 80 km सायकल मारून तिसऱ्या चेक पॉइंटला ,म्हणजे साई इंटरनॅशनलला पोहचायचे होते. नेहमी प्रमाणे मी माझी गणित लावली न थांबता जाऊ, वगरे वगरे पण सूर्य देवाने भट्टी चांगलीच तापवली. दोन तास जीव काढून सायकल चालवल्यावर कराड आले. खाली बघितले तरी घामाचे थेंब हेल्मेट मधून खाली पडत होते .
जवळच सगळं पाणी संपले होत , डोकं दुखायला लागलं होतं उन्हाने नको नको केलं होतं या सगळ्या प्रवासातले त्रासिक असे ते दोन तास होते .
वेळ ,स्पीड, नॉन स्टॉप आणि इतर सगळी गणित बाजुला ठेऊन सायकल कराडला एका हॉटेल पाशी थांबवली. चार पाण्याचा गार बाटल्या घेतल्या तोंड धुतले गार पाण्याने ,कडक चहा सांगितला तो पण डबल. दोन लिटर पाणी प्यालो, माझ्याकडच्या बाटल्या भरून घेतल्या आणि फॅन खाली शांत बसलो ती 15 मिंट फार महत्वाची ठरली.
अक्षरशः बॉडी शांत केली आणि मग परत निघालो साई ला शोधत. कराड नंतर जरा मजा आली सूर्याची भट्टी चार्जिंग संपत आलेल्या लाईट सारखी व्हायला लागली होती .दोन्ही बाजूला मस्त ऊस आणि रस्त्यात सोबतीला जोर जोरात गाणी वाजवत जाणारे ट्रॅक्टर .
कोणाला दोन ,तर कोणाला तीन तीन ट्रॉली मागे लावलेल्या .एका वेगळ्याच रुबाबात रस्त्याचा मधून सावकाश आणि बिनधास्त पणे हे ट्रॅक्टर जात होते . पुढेच दोन तास हे रुबाबशीर ऐरावत माझ्या बरोबर होते. कधी एखाद्याशी स्पर्धा तर कधी एखाद्याशी सलगी मग त्यांच्या त्या सेल्फ डीजे वर लावलेल्या गाण्यांचा आनंद घेत घेत साईच्या शोधत होतो .
हा प्रवास छान झाला साईचा काही अंदाज येत न्हवता
पण रस्ता सरळ होता फक्त मारत राहायचं होत माझ पण चार्जिंग संपत आल होत दोन तास होऊन गेले तरी साई येईना. मग आठवले 15 मिंटचा ब्रेक कुठे कव्हर करणार ?.अरे हो ! कराडची 15 मिंट, मग मार आता, चार्जिंग पार संपयला आलं आणि " पावर बँक" "अजितदादा" ची आरोळी ऐकू आली वर बघितलं तर तिसरा चेक पॉईंट!!!
साई बाबा भेटल्याचा आंनद झाला .!
सगळे खूप खुश होते त्यांच्या लेखी काय झालंच आता आता काय राहिलाय फक्त 30 km
भरभरून कौतुक ,अभिमान, फोटो आणि
त्या बरोबर अजित गोरे यांचे उत्तम "लाडू "आहाहा !काय चव होती त्या लाडुला जगातल्या कुठलाही पदार्थ पेक्षा मला तो लाडू भारी वाटला .तीन चार हानले मस्त पैकी. पाणी इलेट्रोलचा अजून एक हफ्ता झाला.
त्या सगळ्यांनी असे दाखवले आता काय झालाच की! संपलं आजच काम, एन्जॉय ,गंडवत होते की काय? कोणास ठाऊक, कारण तिथून निघालो अंतर 30 km होत पण दिवस भराचे श्रम आणि संपलेली ताकत फक्त "गारवा" शोधत होती . येणार प्रत्येक छोटा छोटा चढ पण खंबाटकी वाटत होता. चढ उतार चालू होता पण "गारवा" काही येत न्हवते .कोल्हापूर नंतर एकच तर चढ आहे, असं ऐकलं होत कोणाच्या तरी तोंडून ,पण तो एक नेमका कोणता ?बापरे वाट पाहत होतो. त्यातल्या त्यात कोल्हापूर आल्यावर जरा बरे वाटले. मातेचं उधो उधो केला आणि म्हणालो तुझ्या दर्शनाला खास येतो परत सायकल वर, पण एवढी वारी पार पडुदे माते अगदी व्यवस्थित.
मातेचं आशीर्वाद घेऊन पुन्हा पाय सुरू उगाचच डोळे रस्त्याच्या बाजूला असलेले बोर्ड वाचायचे कुठे "गारवा"
दिसतोय का ?पण "गारवा " काही दिसत न्हवता.
पुन्हा पॅडल एखाद्या ठिकाणी चार पाच जणांचा ग्रुप लांबवर दिसला की वाटायचं हा हा तो काय आला "गारवा" पण "गारवा" काही येत न्हवता,कोल्हापूर पार करुन सायकल पुढे गेली एक छोटा चढ समोर दिसला मनात आलं येस हाच तो चढ आता "गारवा "आला.
सगळा जीव लावून सायकल मारली चढ पार केला. मोठ्या आशेनं बघितले पण "गारवा " काही आला नाही
आता मात्र स्वतः वरच चिडलो "गारवा" येईल तेव्हा येईल वर बघायचेच नाही. काय व्हायचे ते हाऊ दे! उतार वर जरा रिलॅक्स झालो ,पुन्हा चढ मान खाली दात ओठ खाऊन पाय मारत होतो .उतार सुरू झाला मला माहित होतं ,पण हा उतार गंडावतो आपण मारत राहू आणि मारत मारता एक वेगळा आवाज कानी पडला ,
दादा आला sssssss
हा आवाज होता "अविनाश द लोणावळा लायन "चा अजित दादांची जागा आता त्यांनी घेतली आणि माझा "गारवा "आला .
अविचा आवाज आला ,
ये ssssssss दादा आला !!!!!!!!!!
मी म्हणालो गारवा आला sssssss
हा गारवा अनेक पद्धतीने त्या दिवशी आयुष्यात आला .
शेवटचं चेक पॉईंट ,राहण्याची जागा ,आणि मनाला गारवा . कारण समोर होत हॉटेल "गारवा ".
260 km अंतर एक दिवसात कापून ,ते देखील ठरलेल्या वेळेच्या आधी ,दिवसभर अक्षरशः भाजून घेऊन हा " गारवा " आला. जस्ट आलेल्या विशी ने मिठी मारली. त्याचा सारखा जिनियस जेव्हा कौतुक करतो तेव्हा खरोखर भारी वाटत.


मग काय मजा मजा, कोण पुढे ,कोण मागे ,काय झालं हे झालं ,ते झाल ,बापरे !अच्छा !आई शप्पथ !

" लै भारी याने मारलं ,त्याने एवढं मारलं ,
हा पहिला ! हा दुसरा ! ह्याला क्रम्प ,त्याच पंचर , असा एक संपूर्ण दिवसभराच चित्रपट पटा पट सगळ्यांच्या तोंडातून थोडा थोडा साकारला गेला आणि मग सगळेच जण फ्रेश व्हायला आप आपल्या रूम मध्ये गेले. मी जस्ट घरी फोन करून खुशाली कळवली तर तिला आधीच सगळे कळले होत राजेश आणि लाडकी " तुरु तुरु ऋतू " अजित दादा बरोबर संपर्कात राहून सगळे अपडेट स्वानंद च्या ग्रूपवर टाकत होते. त्याचा प्रत्यय लगेच आला .आसावरी ताईचा लगेच फोन आणि आम्ही येतोय असे म्हणून ती लगोलग सगळ्यांना घेऊन हजर. न जाणो कोणत्या जन्मीची ही सगळी नाती आहेत. पण ती फार खोलवर रुतली आहे .
संतोष दादा ,अक्षय या स्वानंदिनचा पण फोन आला दादा आम्ही निघालो इचलकरंजी हुन तुला भेटयाला.
कस बस दोघांना समजावले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 च रेपोर्टिंग होत 9.30 नंतर कोणालाही भेटायचे नाही आणि फक्त विश्रांती घ्यायची असा आदेश पण होता .रात्री एक लिटर इलेक्टरोल प्यायचे असा अजित दादांचा सल्ला आदल्या दिवशी फार उपयोगी पडला होता त्यामुळे पुन्हा रिपीट केले भरपूर पाणी प्यालो थोडं जेवण केले आणि लगेच झोपलो .
शरीर जेवढ्या वेगाने झोपी गेले,
तेवढ्याच हळू हळू वेगाने ,
मन मात्र परत उलट वाघोली पर्यंत गेले .


मंतरलेले ते तेरा तास अनुभवत जतन करत आणि वाट पाहत की उद्याचे 13 तास काय करून सोडणार
मंत्रवून सोडणार ? की मोहरून टाकणार ?
क्रमशः
शंकर उणेचा
०४.१२.२०१७.