माझी पहिली अविस्मरणीय १०० किमी सायकल राईड ( चिंचवड - रांजणगाव - चिंचवड ) :: - शंकरजी उणेचा

नुकतीच माझी 100 KM ची राइड पूर्ण झाली .अर्थातच ही राइड समर्पित करत आहे ICC ला आणि मला प्रेरित करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणींना .

माझ्या या राईडचा अनुभव आपल्या सगळ्या बरोबर शेअर करत आहे. कदाचित जरा जास्त लांबण लागली आहे .पण ICC  बद्दलचा ऋणानुबंध व्यक्त करण्याची अशी दुसरी संधी मिळणार नाही म्हणूनच आपल्या सगळ्यांचाच थोडा जास्त वेळ घेत आहे .

पण आपण सर्वांनी हा लेख जरूर वाचा.

कारण कदाचित हा फक्त माझा अनुभव नसून सायकल चालवणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्राचा असेल तो फक्त माझ्या शब्दातून आकार घेतोय

धन्यवाद !

      "निश्चयाचा महामेरू बहुत जनासु आधारू"

खरोखर महाराष्ट्रच्या पावन भूमीत अनेक संतांनी अगदी साध्या भाषेत खूप मार्मिक आणि जीवनात अत्यंत उपयुक्त आशा गोष्टी अगदी सहज सांगितल्या , आणि आपण मात्र फक्त त्या ग्रंथांची पूजा करत बसतो . त्यात काय लिहिले आहे याची प्रचिती घेण्याचा ,साधा प्रयत्न देखील करत नाही. मात्र नियतीच्या खेळा पुढे कोणाचेच काही चालत नाही. आणि ती जेव्हा या गोष्टींचेवास्तवास्त दर्शन घडवते तेव्हाच आपण त्या मानतो आणि मग अनुभव ,ब्लॉग लिहायला लागतो. खर आहे ,माझं ही तसच झाले .

इंडो सायकलिस्ट क्लब च्या एका इव्हेंट मध्ये या क्लबशी कायमचे नाते जोडले गेले .कारण होता उमेश गोलांडे ,आणि यतीश भट खूप दिवसांनी सायकल चालवली आणि दिलेले अंतर पूर्ण केले पण त्या सगळ्यांचा जोश आणि प्रत्येकाला पाठींबा देण्याची वृत्ती फारच मोहक होती . मग काय या मोहाच्या जाळ्यात अडकलो ,आणि मी पण  रोज सायकल चालवायला लागलो. या स्पिरिटेड लोकांच्या सानिध्यात आलो आणि मी पण बिघडलो. रोजच्या राईडच्या वेळी ग्रेट  गज्जू ची भेट व्हायची, कमाल  शांतपणे सायकल चालवायची त्याचि पद्धत खरोखर अप्रतिम आणि शिकण्या सारखी आहे .

रोजच्या राइड मध्ये देखील एकमेकांना मदत करत छान माहिती देत सायकलिंग चालू  होतं. ग्रुप मध्ये जॉईन झालो ,फेस बुकच्या ग्रुप मध्ये पण सामील झालो ,आणि बघता बघता सगळे चॅम्पियन भेटायला लागले . थोडी राइड बद्दल माहिती ,सायकल बद्दल रेकॉर्ड ठेवण्या संदर्भात , आणि इतर काही छोट्या छोट्या शंका निवारण करण्यासाठी दीपकला फोन केला. दीपक नाईक म्हणजे घरचा माणूस खूप दिवसांनी बाहेर भेटला असे झाले . मग दीपकला घेऊन NDA ला गेलो. त्याला हॉर्स रायडिंग दाखवणाच्या निमित्ताने त्याच्याशी भरपूर गप्पा  मारल्या . आणि मग त्यातच  स्टारवा आणि इतर गोष्टी मार्गी लागल्या . काहीच माहीत नसल्यामुळे कुठूनही सुरवात करायला काहीच हरकत न्हवती .मग काय रोज सकाळी किमान तास भर तरी सायकल चालवू असा संकल्प करून बाहेर पडलो.पण खरच अगदी मनापासून सांगतो सकाळी सकाळी सायकल चालवताना ,निसर्ग जणू भर भरून तुमच्या वर प्रेम ओतत असतो .अतिशय मंत्रमुग्ध अश्या सकाळच्या वातावरणात एखाद्या मस्त पार्टनर बरोबर सायकलचे पॅडल मारत भटकण्या सारखे सुख नाही. आणि मग काय रोज अपडेट द्यायचे आणि इतरांचे बघायचे, अशी सगळी धमाल चालू झाली. यातली सर्वात मजेची गोष्ट म्हणजे ना, आपण एखादी 20 किलोमीटर ची राइड मारून येणार ,आपण फुल्ल स्टाईल ने फोटो बरोबर मॅप आणि टॅग लाईन जोडून ते गृप वर टाकणार,सगळे जण आपले खुप कौतुक करणार,कुठे टाळ्या ,कुठे जोडलेले हाथ ,कुठे फुल,कुठे सायकलवरचा माणूस ,कुठे नुसतेच भारी, मस्त असे शब्द येणार आणि तुम्ही त्याच्यात हरवायला लागणार तेवढयातकोणाची तरी 60 किलोमीटर राइड ची पोस्ट टाकतो  ( खास करून डोनी ) मग आपल्याला आपला गाशा गुंडाळावा लागतो ,कळत अरे अजून बरच आहे, आता तर आपण 20 वर आहोत . मग सsssगळी वरची चिन्हे आपण टाकायला लागतो ,मनात दुसऱ्या दिवशीच्या राइड ची तयारी सुरू होते .उद्या जरा जास्त चालवु असे लगेच पक्के ठरते. दुसऱ्या दिवशी सकाळी 15 मिंट आधी गजर वाजतो आणि सायकल बाहेर पडते 30 किलोमीटर चा टप्पा गाठायला .अवघड वाटणारी गोष्ट सहज सध्या होताना दिसते आणि कधी एका तास वरुन तुम्ही दोन तास सायकल चालवायला लागला हे तुम्हाला ही कळत नाही .पण तुम्ही भलतेच चार्जेड झालेला असता .परत 30 किलोमीटर ची पोस्ट  परत टाळ्या ,परत नमस्कार, परत मस्त, परत फुले, भारी आनंदतेवढ्यात अजितची 120 किलोमीटर ची पोस्ट। !!!!! 

पण आता तुमचा आनंद द्विगुणीत होतो कारण तुम्ही पोस्ट करण्यासाठी सायकलिंग करण्याच्या पलीकडे गेलेले असता. तुम्ही फक्त हा विचार करता की मला 30 किलोमीटर मध्ये जर एवढा आनंद मिळाला ,तर अजित ला किती आनंद झाला असेल, वा !!!!!!

आपण पण हा आनंद घ्यायचा .आणि हा आनंद जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहोचवायचा .

ठरलं तर मग आता शंभर मारायचीच .

रोजच्या कामाच्या भानगडी आणि दिवस ठरवण्यात जास्त वेळ न घालवता लगेच सुटायचं असे पक्क ठरवलं. रविवारी माझ्या संस्थेचा स्वानंद सेवा ट्रस्ट चा कारेक्रम होता सकाळी 6 वाजल्या पासून रात्री 10 असे   नियोजन होते ."स्वानंद" आणि "घळसासी" सर हे माझ्या जीवनातले अतूट आणि अतिशय अमूल्य असे नाते आहे. माझा संकल्प पूर्ण होण्या मागे सगळ्या स्वानंदिनचाआणि सरांचा पण फार मोठा वाटा आहे .कारण सरांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही एक आगळा वेगळा संकल्प केला होता आणि तो म्हणजे रोज काहींना काही व्यायाम करून त्याचे अपडेट स्वानंद ग्रुपवर टाकायचे सराना वाढदिवसाची भेट म्हणून. आणि खरोखर सगळे स्वानंदी रोज काही ना काही व्यायाम करून ग्रुप वर टाकत होते. मी रोज किमान 30 ते 40 किलोमीटर सायकलचालून अपडेट देत होतो आणि  सगळ्यांना चार्ज करत होतो. त्यामुळे साहजिकच फायदा मला जास्त झाला .माझा आत्मविश्वास जरा वाढला होता .

आता फक्त  || " एक धक्का और दो सेंच्युरी को तोड दो" || एवढंच राहिले होते.

मंगळवार 1 ऑगस्ट 2017 पहाटे साडेतीन वाजता घराबाहेर पडलो आधी चिंचवड गावात मोरया गोसावी मंदिरा पाशी गेलो ,कळसाचे दर्शन घेतले आणि मनात ठरवले की महागणपती च्या दर्शनाला जाऊ रांजणगाव गाव 65 किलोमीटर आहे .जाऊन आलो की 100  नक्की होईल वन वे 65 असल्याने फार अवघड होणार नाही .त्याच्या दर्शनाला जाऊ मग तो दाखवेल त्यारस्त्याने परत येऊ . मोरयाचे नाव घेतले मारुतीरायाचे स्मरण केले ( ताकतिची गरज होती  ) आणि निघालो. कडक अंधार, गार हवा आणि सुनसान रास्ता , व्वा क्या बात है. हा अनुभव घ्यायलाच हवा .खडकी मार्गे येरवडा आणि मग नगर हायवे पकडून सरळ जायचे असे ठरवले लवकर निघण्याचे कारण म्हणजे ट्राफीक सुरू होण्या आधी वाघोली गाठायचीच असे पक्के ठरवले होते. एकदा पुढे गेलो की मग काही अडचण नाही सायकल पुरती जागा सहज मिळते. साधारण 30 किलोमीटर चा टप्पा होता अर्थातच स्पीड फार नसल्याने माझ्या अंदाजाने दोन तास किमान लागणार होते .मी आरामात पॅडल मारत जात होतो. अव्याहत बदल हा निसर्गाचा नियम जाणवत होता. पहाटे साडे तीन वाजता रस्त्यावर गुरगुरत जाणार एखादा मोठा ट्रक ,काही कुत्री आणि मी एवढेच जण होतो. बाप्पाला म्हणालो लक्ष ठेव रे बाबा. मग काय अंदाज घेत घेतसायकल चालवत होतो.खडकी मार्गे जाताना अंधारात  झाडांची कमान काय भयंकर दिसत होती .चला चला उणेचा लवकर चला असे स्वतःशीच बोलत होळकर गाठला .जरा काटा 4 च्या आसपास आला होता निसर्ग बदल दाखवत होता .ट्रक आणि कुत्रांच्या जोडीला दुधाचे टेम्पो आणि पेपरचे गठ्ठे रस्त्यावर पडत होते .अजूनही मीच त्यांच्या कडे बघत होतो माझ्या कडे बघणार कोणी न्हवते .पण जरा बरवाटत होतं. "काम चालू रस्ता बंद " या पाटी प्रमाणे पाय चालू होते .येरवाड्याच्या चौकातुन पुढे गेल्यावर बाहेर गावहून येणाऱ्या गाड्या ,आणि त्यातून डोळे चोळत उतरणारे पॅसेंजर आता नजरेत पडायला लागले होते .साधारण एक ते दीड तास झाला होता. "अंधेरा अभि भी कायम था , मगर सायकल का अंदाज कुछ और ही था". साधरण 5 ते 5.30 झाले असावे गार हवेची झुळुक मनाला आणि शरीराला आल्हाद दायक करत होती छोटे छोटे टार्गेट लावून सायकल चालवत होतो. म्हणजे 5 किलो मीटरचा टप्पा मग 10 किलोमीटरचा टप्पा आशा प्रकारे सर्वात मोठा फायदा हा होता की अंधारातून उजेड येईपर्यंतच निम्मे काम झालं होतं म्हणजे सायकलिंग च्या श्रमापेक्षा अंधारातून सायकल नीट काढण्यात मजा जास्त होती.सगळे काही ठीक ठाक चालू होतं. डेकॅथलॉन गेले आणि एक वेगळीच स्फूर्ती आली कारणसूर्य देव आपले पहिले कोवळे किरण फेकत होता .दोन्ही बाजूला मस्त हिरवी गार शेत आणि मधून जाणार लांब लचक डांबरी रस्ता .आता फक्त अंतर आणि मी. शक्यतो कुठेही थांबायचे नाही असे ठरवले होते .अगदीच नाईलाज झाला किंवा वाटले तर  थांबू , नाहीतर बघू तरी आपण पण किती तग धरू शकतो ते कारण मुख्य टार्गेट माऊली आहे मग बाप्पा कडे प्रयत्न तर करू ,की किती ओढू शकतो स्वतःला ते , पण खरच तुम्ही मना पासून जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा सगळ्या बाजूने निसर्गच तुमच्या मदतीला धावून येतो पाऊस नाही , की कडक ऊन नाही मस्त मजा करत उतारावर सायकल वरच आराम करत एक एक चढ पार करत बाप्पा च्या दिशेने वेगाने निघालो होतो. आपण एकटे असलो ना की भारी माजा करता येते .कधी उतारावर जोरदार स्प्रिंट तर कधी चढावर फुल्ल हुश्याहैंया,कधी एखाद्या दुचाकी बरोबर छोटीशी स्पर्धा तर कधी एखाद्या टम टम ला टॉप गेर टाकून वाकुल्या दाखवत मागे टाकण्याची मजा काही औरच.

या सगळ्या खेळात एकदम किलोमीटर च्या दगडावर  दिसलं  रांजणगाव 7 किलोमीटर आहाहा काय फिलीग होत म्हणून सांगू पुढचे सात किलोमीटर अक्षरशः स्प्रिंट मध्येच काढले संपूर्ण प्रवासात एवढा वेग कधीच न्हवता. पूर्ण ताकत लावून शेवटचा चढ चढलो आणि मग फक्त सायकल सोडून दिली थेट बाप्पाच्या कमानीत पहिली मोठी कमान दिसली बाप्पाचा जयघोष केला आणिसरळ मंदिरात गेलो 

 "भव श्रम हरला हो मोरया देखीला हो " मंगलमूर्तीचे दर्शन घेतले आणि थकवा कुठेच्या कुठे पळाला. मग मस्त पैकी शांत पणे गाभाऱ्यात बसलो आरतची तयारी झाली होती . बाप्पा जणू या संकल्पात पूर्ण पणे पाठीशी होता .पुजाऱ्याने स्वतःहून टाळ हातात दिला आणि म्हणाले उभे राहा मंडपात आरतीला .मग काय विचारता आनंदच आनंद .पोहचतो की नाही अशा विचारात असताना , साक्षात बाप्पाच्या आरतीचा आनंद . आरती घेतली, प्रसाद ,अभिषेक,फोटो आणि टपरी वरचा फक्कड चहा यात एक तास कुठे गेला कळेच नाही .सूर्य नारायण जणू इशारा देत होता निघ लवकर आता मी येतोय जोरात मग गडबड होईल तुझी. बस्स ठरवले जाताना पण सायकल मारतच जायचे आणि निघालो पण , येताना सगळं असे किरकोळ वाटत राहतं. कारण तो रस्ता तुम्ही आधीच तुमच्या पायाखालून घातलेला असतो आणि मग एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्यात येतो .तीन टप्प्यात जाऊ असा विचार करून निघालो साधारण 30 ते 35 KM वर डेकॅथलॉन होते . तिथे आलो म्हणजे जिंकोलच हे गणित नक्की होते .कारण तिथं पर्यंत दोन तीन वेळा फेरी झाली होती.आता गाड्यांची गर्दी वाढली होती पण या गर्दीतही बकअप , भारी आणि टाळ्या किंवा आनंदाने पाठिंबा देणार "दर्दी "ही सापडत होते .उन्ह ,ट्राफिक आणि सकाळ पासूनचे श्रम यामुळे येताना जरा  कठीण पण जाणवत होता .पण मन मात्र एकदम शांत आणि उत्साही होते .फरक पडला होता तो फक्त वेगाचा,पण त्याने फारसा फरक मला तरी पडत न्हवता. गज्जू ची आठवण आणून निवांत पॅडल मारत डेकॅथलॉन ला पोहचलो  इथे मात्र मला ब्रेक घ्यावा लागला .कारण गर्दी मुळे सायकल मारणे अवघड होतं होते. सारखे थांबायचे आणि पुन्हा सुरवात हे खरोखर वार्षिक परिक्षे सारखे असते .एकदम अवघड पण ही परीक्षा पण पास झालो. तिथे मस्त लिंबू पाणी घेतले फ्रेश झालो, दहा मिंट बसलो आणि घड्याळ बघितलं तर वेळ बराच झाला होता .मग मात्र मरगळ झटकून उठलो आणि पुन्हा सुरू झालो ,साधारण तास भाराने येरवाड्याच्या  चौकात आलो. एकुणात गाडी किमान एक तास लेट होती .मुद्दामच आल्या नंतर झोपू नये म्हणून शेड्युल लावून ठेवले होते. कपडे बरोबर  होतेच मग काय घरी न  येता सरळ पुण्यात गेलो. आंघोळ करून, फ्रेश होऊन ,माझ्या कामाला बाहेर पडलो दिवस भर काम केले आणि मग रात्री सायकल घेऊन परत घरी आलो .रात्री येताना खरोखर ,महाराजांच्या  एखाद्या मावळ्याला गड सर करून आल्यावर होतो तेवढा आनंद मला झाला होता. पण  कितीही शब्द गुंफले तरी त्याचा फील घेण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच सायकल चालवायला लागेल हे नक्की .ह्या आनंदला मुकू नका. नक्की सायकल चालवा आणि पहा या लेखात मी जसे जसे वर्णन केले, तसे तसे तुमचा प्रवास होतो की नाही ते तुम्ही पण जगता की नाही .हा पण हा अनुभव घेतल्या नंतर सर्वांशी आणि माझ्याशी पण शेअर करायला मात्र नक्की विसरू नका .

कुणास ठाऊक तुमचा अनुभव कुणा कुणाला ,आणि कुठे कुठे नव नवीन विक्रम  करायला प्रेरणा देऊन जाईल .

हा ,तर मग नक्की कळवा

अरे हो ssss।  नंबर ना ,देतो ना.

शंकर उणेचा 9822456595

unechast@gmail.com

धन्यवाद!

Comments

Excellent Dada.

दादा खुपच छान वर्णन केले आहे डोळ्यासमोर पूर्ण प्रवास उभा केला आहे 
असेच लिहीत जा आणि इतेरांना प्रोहाच्चन देत जा 

Nice blog.... Happy cycling